नवी दिल्ली | 22 ऑगस्ट 2023 : सोन्या-चांदीला श्रावण सोमवार पावला. दोन्ही धातूत किंचित वाढ झाली. जागतिक बाजारात सोन्याची कामगिरी सुधारलेली नाही. डॉलर अजूनही खुषीत आहे. सोने-चांदी उसळीच्या तयारीत असले तरी जागतिक घडामोडींमुळे या धातूंना उभारी नाही. श्रावणात पहिल्या सोमवारी दोन्ही धातूंच्या किंमतीत वाढ झाली. त्यांनी इतक्या दिवसांच्या घसरणीला या महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात ब्रेक लावला. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सराफा बाजाराता खरेदीदारांनी उसळी घेतली होती. फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यातील दरवाढीची बरोबरी अजूनही सोन्याला करता आलेली नाही. ऐन सणासुदीत किंमती वधारतील, असा काहींचा कयास आहे. त्याला किती यश येते हे लवकरच समोर येईल. काय आहे सोने-चांदीचा भाव (Gold-Silver Price Today 22 August 2023).
सोन्यात किंचित वाढ
गेल्या आठवड्यात सोने-चांदीने नांगी टाकली होती. यापूर्वी सोन्यात 1 ऑगस्ट आणि 5 ऑगस्टला वाढ नोंदविण्यात आली आहे. गुडरिटर्न्सनुसार या दोन दिवशी किंमती 100 ते 150 रुपयांनी वधारल्या. 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली.17 ऑगस्ट रोजी किंमती 350 रुपयांनी घसरल्या. 18,19,20 ऑगस्ट रोजी भावात बदल नाही. 21 ऑगस्ट रोजी सोन्याच्या भावात 50 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोने 54,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,220 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. गुडरिटर्न्सने ही आकडेवारी दिली आहे.
चांदी वधारली
ऑगस्ट महिन्यात चांदीची चमक फिक्की पडली. चांदी 6000 रुपयांनी स्वस्त झाली. 16 ऑगस्ट रोजी चांदीने घसरणीला ब्रेक लावला होता. भाव 200 रुपयांनी वाढले होते. 18 ऑगस्ट रोजी चांदीने 1000 रुपयांची चढाई केली. 19 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची घट झाली. 21 ऑगस्ट रोजी किंमतीत पुन्हा 200 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,350 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 58,396 रुपये, 23 कॅरेट 58,163 रुपये, 22 कॅरेट सोने 53,490 रुपये, 18 कॅरेट 43,797 रुपये, 14 कॅरेट सोने 34,161 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,835रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.