Gold Silver Rate Today | सोने चमकले, चांदी लकाकली, असे वधारले सराफा बाजारात भाव
Gold Silver Rate Today 22 February 2024 | या आठवड्यात सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. गेल्या आठवड्याच्या शेवटी दरवाढ झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातू महागले तर मंगळवारी किंमतीत घसरण झाली होती. आता पुन्हा दोन्ही धातूंनी आगेकूच केली आहे. सराफा बाजारात जाण्यापूर्वी भाव जाणून घ्या..
नवी दिल्ली | 22 February 2024 : सराफा बाजारावर जागतिक बाजाराचा प्रभाव दिसून येत आहे. कच्चे तेल, अमेरिकन महागाई आणि बेरोजगारीचा दर, जागतिक गुतवणूकदारांचा कल, चीनची आर्थिक परिस्थितीत तर जपानसह युरोपातील देशांवर मंदीचे सावट या सर्वांचा परिणाम सध्या सराफा बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे किंमतीत सातत्याने चढउताराचे सत्र दिसून येत आहे. एका दिवसातच किंमतीत बदलाचे सत्र दिसून येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूत दरवाढ झाली. नंतर भाव घसरले. आता पुन्हा किंमतीत वाढ झाली. अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 22 February 2024)
- सोन्यात चढउताराचे सत्र – गेल्या आठवड्यात सोने स्वस्त झाले. तर आठवड्याच्या अखेरीस सोने चमकले. 16 फेब्रुवारी रोजी 200 तर 17 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली. तर 19 फेब्रुवारी रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. 20 फेब्रुवारी रोजी भाव 100 रुपयांनी कमी झाला. 21 फेब्रुवारी रोजी सोने 250 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- स्वस्ताईनंतर चांदी महागली – चांदीत गेल्या काही दिवसांपासून चढउताराचे सत्र आहे. 16 फेब्रुवारी रोजी 1100 तर 17 फेब्रुवारी रोजी 900 रुपयांनी चांदी महागली. या आठवड्याच्या सुरुवातीला 20 फेब्रुवारी रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 21 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये आहे.
- 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारले. 24 कॅरेट सोने 62,258 रुपये, 23 कॅरेट 62,009 रुपये, 22 कॅरेट सोने 57,028 रुपये झाले. 18 कॅरेट 46,694 रुपये, 14 कॅरेट सोने 36,421 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,708 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
- किंमती मिस्ड कॉलवर – 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.