सोने आणि चांदीने या आठवड्यात मोठी मुसंडी मारली. सोमवारी दोन्ही धातुत घसरण दिसली. त्यानंतर सलग तीन दिवस या धातुनी जबरदस्त फलंदाजी केली. गेल्या आठवड्यात सुद्धा किंमतीत मोठी वाढ झाली होती. अमेरिकन आक्रमक व्यापारी धोरणाचा परिणाम म्हणा अथवा इतर कारणं म्हणा दोन्ही धातुनी जानेवारी नंतर जी लांब उडी मारली. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या किंमती सातत्याने का वाढत आहे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 23 March 2025 )
सोन्याचा पुन्हा ब्रेक
या आठवड्यात सोमवारी 110 रुपये तर शुक्रवारी 440 रुपयांनी असे एकूण 550 रुपयांनी सोने स्वस्त झाले. तर मध्यला तीन दिवसात, मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी 440 रुपयांनी दर वधारले. गुरूवारी 220 रुपये, अशी एकूण 1100 रुपयांची दरवाढ सोन्याने नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 90,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत मोठी पडझड
चांदीने गेल्या महिन्यापासून चांगलीच घोडदौड केली. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 100 रुपयांनी तर अखेरीस शुक्रवारी 2100 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. मध्यंतरी तीन दिवसात मंगळवारी 1100, बुधवारी 1000 रुपये तर गुरुवारी 100 रुपयांनी असे एकूण 2200 रुपयांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,03,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 88,169, 23 कॅरेट 87,816, 22 कॅरेट सोने 80,763 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,127 रुपये, 14 कॅरेट सोने 51,579 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,620 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
महागाईचा वेलू गगनावरी
या वर्षात आतापर्यंत सोन्यात 16 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. आतापर्यंत सोने आणि चांदीने उच्चांकाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सध्या शांततेची चर्चा सुरू असली तरी मध्यपूर्व जगातील तणाव, रशिया-युक्रेनमधील तणाव आणि अमेरिकन आक्रमक व्यापारी धोरणामुळे दोन्ही धातु नवनवीन रेकॉर्ड करत असल्याचे म्हटले आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.