नवी दिल्ली | 23 नोव्हेंबर 2023 : गेल्या दहा दिवसांतच सोने-चांदीने दरवाढीचा आलेख उंचावला. दिवाळीत सोने-चांदीत मोठी दरवाढ झाली. गेल्या आठवड्यात सोन्यात 1200 रुपयांची वाढ झाली. तर चांदी 4100 रुपयांनी वधारली. सोने-चांदीतील दरवाढीचे सत्र कायम आहे. या आठवड्यात सोमवार वगळता या दोन दिवसांत दरवाढीला ब्रेक लागलेला नाही. यामुळे ग्राहकांचा मोठा हिरमोड झाला. सराफा बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. गेल्या दहा दिवसांत किंमतींनी मोठा पल्ला गाठला. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 23 November 2023)..
दहा दिवसांत 1500 रुपयांची वाढ
13 नोव्हेंबरपासून सोन्याने ग्राहकांना चांगला परतावा दिला. सुरक्षित परतावा हवा असणाऱ्या ग्राहकांना या काळात मालामाल होण्याची संधी मिळाली. या 10 दिवसांत सोन्याच्या किंमतीत 1500 रुपयांची वाढ झाली. या आठवड्यात 20 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात 50 रुपयांची घसरण झाली. 21 नोव्हेंबर रोजी भाव 380 रुपयांनी वाढले. 22 नोव्हेंबर रोजी भावात बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
10 दिवसांत 4600 रुपयांची दरवाढ
13 नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीने 4600 रुपयांची भरारी घेतली. 15 नोव्हेंबर रोजी किंमती थेट 1700 रुपयांनी वधारल्या. तर 16 नोव्हेंबर रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 17 नोव्हेंबर रोजी चांदीच्या किंमतीत 1500 रुपयांची वाढ झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीला ब्रेक लागला. पण 21 नोव्हेंबर रोजी किंमती 400 रुपयांनी वाढल्या. 22 नोव्हेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव असा
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,616 रुपये, 23 कॅरेट 61,369 रुपये, 22 कॅरेट सोने 56,440 रुपये झाले. 18 कॅरेट 46,212 रुपये, 14 कॅरेट सोने 36,045 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,465 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.