मागील आठवड्यापासून सोने आणि चांदीत नवनवीन विक्रमाची नोंद होत आहे. दोन्ही धातुनी जोरदार कामगिरी बजावली आहे. सोने आताच 80 हजारांच्या उंबरठ्यावर तर चांदी लाखाच्या घरात आहे. तज्ज्ञांच्या मते या दिवाळीपर्यंत सोने 80 हजारांचा टप्पा ओलांडणार आहे तर चांदी एक लाखांचा टप्पा ओलांडेल. सुरक्षित गुंतवणूक म्हणून या धातुकडे बड्या गुंतवणूकदारांनी मोर्चा वळवला आहे. यामागे वैश्विक कारणं आहेत. अमेरिकेत निवडणुका आहेत. तर पश्चिम आशियात सोन्याची मागणी दुप्पटीच्या जवळपास वाढली आहे. चीनने चांदी आणि जस्तची मोठी मागणी नोंदवली आहे. देशात दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. बाजारात सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. अमेरिकन फेडरल बँकेने व्याजदरात कपात केल्याने आणि देशात सरकारने आयात शुल्क घटवल्याने सोने-चांदीची मागणी वाढली आहे. या सर्व कारणांमुळे मौल्यवान धातु तेजीत आहेत. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 23 October 2024 )
सोने 80 हजारांच्या पैलतीरी
मागील आठवड्यात सोने 1600 रुपयांनी वधारले. या आठवड्याची सुरुवात महागाईने झाली. 21 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी वधारले. मंगळवारी शांतता होती. तर आज 23 ऑक्टोबर रोजी सोन्यात 430 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,220 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी लखपती
मागील आठवड्यात चांदी तीन हजार रुपयांनी महागली होती. तर या आठवड्यात सुरुवातीच्या तीन दिवसांत चांदीने महागाईला फोडणी दिली. 21 ऑक्टोबरला 1500 रुपये, मंगळवारी हजार तर आज 23 ऑक्टोबर रोजी दोन हजारांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,04,000 रुपये झाला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,251, 23 कॅरेट 77,938, 22 कॅरेट सोने 71678 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,688 रुपये, 14 कॅरेट सोने 45,777 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,372 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.