पितृपक्षात सोने आणि चांदीने कमाल दाखवली. गेल्या आठवड्याच्या मध्यात किंमती घसरल्या होत्या. तर अखेरच्या सत्रात दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली. अमेरिकन फेडरल बँकेने व्याज दरात कपात केली. तर दुसरीकडे क्रूड ऑईलचे भाव घसरले. त्याचा जागतिक बाजारावर परिणाम दिसून आला. बड्या गुंतवणूकदारांनी बेशकिंमती धातूंकडे मोर्चा वळवला. त्यामुळे या धातूंच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. गेल्या दोन आठवड्यात या धातूंनी मोठी मजल मारली आहे. ग्राहक या काळात खरेदी शुभ मानत नाहीत. तरीही बाजाराच्या या नवीन वळणाने त्यांना धक्का दिला. आता असा आहेत या मौल्यवान धातूच्या किंमती…(Gold Silver Price Today 23 September 2024 )
सोने सुटले सुसाट
गेल्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आणि अखेरच्या सत्रात किंमती उसळल्या. सुरुवातीला 110 रुपये तर तर 20 सप्टेंबर रोजी सोन्याने 660 रुपयांची भरारी घेतली होती. या आठवड्याच्या सुरुवातीलाच 23 सप्टेंबर रोजी सोन्याचा दर वधारला. किंमती 220 रुपयांनी महागल्या. आज सकाळच्या सत्रात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 69,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दरवाढीनंतर चांदीची माघार
चांदीत गेल्या 15 दिवसांत 10 हजार रुपयांची दरवाढ झाली होती. गेल्या आठवड्यात चांदी 2500 रुपयांनी महागली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत कोणताही बदल दिसला नाही. आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत.
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,900 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 74,467, 23 कॅरेट 74,169, 22 कॅरेट सोने 68,212 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 55,850 रुपये, 14 कॅरेट सोने 43,563 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,756 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?
पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.