नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : जागतिक बाजारात सोन्याने पुन्हा चमकदार कामगिरी केली. गुरुवारी सोने दोन आठवड्यांच्या उच्चांकावर होते. पण त्याचा भारतीय सराफा बाजारावर संध्याकाळपर्यंत परिणाम दिसेल. सकाळच्या सत्रात सोन्याला लांबचा गाठता आला नाही. चांदीने सोन्यापेक्षा सरस कामगिरी बजावली. जगातील मोठ-मोठ्या गुंतवणूक संस्था आता अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणाकडे डोळे लावून बसले आहे. युएस फेडरल रिझर्व्ह बँकेची बैठक सुरु झाली आहे. 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान ही बैठक होत आहे. त्यानंतर बँकेचे प्रमुख जेरोम पॉवेल भूमिका जाहीर करतील. गेल्या एक वर्षांपासून महागाई आटोक्यात आणण्यासाठी बँकेने आक्रमक धोरण आखले आहे. त्याचा सोन्या-चांदीवर पण परिणाम दिसून आला. दोन्ही धातूंनी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात सर्वकालीन उच्चांक गाठला होता. मे आणि जून महिन्यात त्याला मोठी झेप घेता आली नाही. तर जुलै महिन्यात किंमती वधारल्या होत्या. या महिन्यात पण दोन्ही धातूंना (Gold-Silver Price Today 23 August 2023) विशेष कामगिरी बजावता आलेली नाही.
दरवाढीला ब्रेक
ऑगस्ट महिन्यात सोन्यात सातत्याने पडझड झाली. त्यानंतर या आठवड्यात सोन्याने महागाईचा बिगूल वाजवला. या महिन्यात सोन्यात 1, 5 ऑगस्ट नंतर या तीन दिवसांत वधारले. 21 ऑगस्ट रोजी सोन्याच्या भावात 50 रुपयांची वाढ झाली. 23 ऑगस्ट रोजी भावात 180 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोने 54,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,400 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. गुडरिटर्न्सने ही आकडेवारी दिली आहे.
चांदी सूसाट
ऑगस्ट महिन्यात चांदीत पडझड झाली. 16 ऑगस्ट रोजी चांदीने घसरणीला ब्रेक लावला. भाव 200 रुपयांनी वाढले होते. 18 ऑगस्ट रोजी चांदीने 1000 रुपयांची चढाई केली. 19 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची घट झाली. 21 ऑगस्ट रोजी किंमतीत पुन्हा 200 रुपयांची वाढ झाली. 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांची वाढ झाली. आता 23 ऑगस्ट रोजी किंमती पुन्हा 500 रुपयांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,300 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 58,520 रुपये, 23 कॅरेट 58,286 रुपये, 22 कॅरेट सोने 53,604 रुपये, 18 कॅरेट 43,890 रुपये, 14 कॅरेट सोने 34,234 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. सोन्याच्या भावात 50-100 रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव 72,६७९ रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.