सोने आणि चांदीचा वारू उधळला आहे. दिवाळीपर्यंत सोने 80 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. तर चांदीने आताच काही ठिकाणी लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दोन्ही धातुत तेजीचे सत्र सुरू आहे. बड्या गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातुत गुंतवणूक वाढवली आहे. जागतिक समीकरणं सध्या बदलत आहे. त्याचा परिणाम किंमती वाढण्यावर दिसून येत आहे. चीनसह पश्चिम आशियातून अचानक सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. देशात सध्या दिवाळीची धामधूम आहे, तर तुळशी लग्नानंतर विवाह मुहूर्त सुरू होतील. या सर्वांचा परिणाम मौल्यवान धातुच्या किंमती वाढण्यात होत आहे. आता अशी आहे सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 24 October 2024 )
जळगाव सराफा बाजारात भाव काय?
जळगावात सराफ बाजारात सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली. सोन्याच्या दराने 80 हजाराचा तर चांदीच्या दराने एक लाख रुपयांचा टप्पा पार केला. सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा 81 हजार 885रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 3 हजार रुपयांवर पोहोचले.. गेल्या सहा दिवसात सोन्याचे भाव तब्बल दीड हजार रुपयांनी महागले. इराण-इस्त्रायल वाद व अन्य आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होऊन सोने-चांदीचे दरात वाढ झाल्याचे सुवर्ण व्यवसायिकांचं म्हणणं आहे.
सोन्याने ओलांडला 80 हजारांचा टप्पा
गेल्या आठवड्यात सोने 1600 रुपयांनी वाढले होते. तर या आठवड्यात आतापर्यंत सोन्यात 650 रुपयांची महागाई दिसून आली. 21 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी वधारले. 23 ऑक्टोबर रोजी सोन्याने 430 रुपयांची मुसंडी मारली. आज सकाळच्या सत्रात दरवाढ दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,220 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी लक्षाधिश
गेल्या आठवड्यात चांदी तीन हजार रुपयांनी महागली होती. तर या आठवड्यात आतापर्यंत चांदीने 4,500 रुपयांची मुसंडी मारली. 21 ऑक्टोबरला 1500 रुपये, 22 ऑक्टोबर रोजी 1,000 तर आज 23 ऑक्टोबर रोजी 2,000 रुपयांनी चांदी महागली. आज सकाळच्या सत्रात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,04,000 रुपये झाला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,692, 23 कॅरेट 78,377, 22 कॅरेट सोने 72,082 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 59,019रुपये, 14 कॅरेट सोने 46,035 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,862 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.