या आठवड्यात सोने आणि चांदीत नरमाईचे सत्र आहे. मौल्यवान धातूंना या आठवड्यात कमाल दाखवता आली नाही. सोने एकदाच 550 रुपयांनी वधारले. तर त्यात 670 रुपयांची घसरण आली. चांदी एकदाच हजार रुपयांनी वधारली. तर ती 300 रुपयांनी स्वस्त झाली. आठवड्याच्या सत्रात दरवाढीला लगाम लागल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आनंदवार्ता मिळाली. आता अशा आहेत या मौल्यवान धातूच्या किंमती (Gold Silver Price Today 25 August 2024 )
सोन्यात 700 रुपयांची घसरण
या आठवड्यात सोने एकदाच 550 रुपयांनी वधारले. तर त्यात 670 रुपयांची स्वस्ताई आली. आठवड्याच्या अखेरच्या सत्रात . 22 ऑगस्टला 380 रुपयांची तर 23 ऑगस्ट रोजी 170 रुपयांची घसरण झाली. 24 ऑगस्ट रोजी किंमतीत बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा ग्राहकांना दिलासा
या आठवड्यात 20 ऑगस्ट रोजी चांदी 1 हजार रुपयांनी वधारली होती. 21 आणि 22 ऑगस्ट रोजी चांदीत कोणताच बदल झाला नाही. 23 ऑगस्ट रोजी चांदी 300 रुपयांनी स्वस्त झाली. काल किंमतीत कोणताही बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,700 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने(IBJA) भाव अपडेट केलेले नाहीत. अशा आहेत कालच्या किंमती 24 कॅरेट सोने 71,424, 23 कॅरेट 71,138, 22 कॅरेट सोने 65,424 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,568 रुपये, 14 कॅरेट सोने 41,7835 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 84,615 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.