Iran-Israel युद्धाचे गडद ढग पांगल्याने जागतिक बाजारातील भीती कमी झाली आहे. सोने-चांदीच्या किंमतींवर त्याचा लागलीच परिणाम दिसून आली. तिसऱ्या युद्धाची चिंता मावळली नसली तरी दोन्ही देशांच्या संयमी भूमिकेने बाजाराला दिलासा दिला आहे. पण चीनच्या खेळीने सोने, चांदी आणि तांब्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. चीन तैवानवर हल्ला करण्याची भीती त्या देशातील नागरिकांना सतावत असल्याने ते अव्वाच्या-सव्वा दराने सोन्याची लूट करत आहेत. भारतीय बाजारपेठेत या आठवड्यात सोने आणि चांदी नरमले आहे. चांदीने 9 दिवसांत 4 हजारांची माघार नोंदवली आहे. काय आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 26 April 2024)
सोने झाले स्वस्त
या आठवड्यात चार दिवसांमध्ये सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या चार दिवसांत सोने जवळपास 2400 रुपयांनी स्वस्त झाले. 22 एप्रिल रोजी भाव 550 रुपयांनी उतरले.23 एप्रिलला 1530 रुपयांनी दर कोसळला. बुधवारी 450 रुपयांनी सोने वाढले. गुरुवारी 26 एप्रिल रोजी 350 रुपयांनी सोने आपटले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा मोठा दिलासा
मागील नऊ दिवसांत चांदीत मोठी पडझड झाली. गेल्या आठवड्यात 17 एप्रिलला चांदी 500 रुपयांनी उतरली. 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी चांदीच्या भावात बदल झाला नाही. या आठवड्यात 22 एप्रिल रोजी चांदी 1 हजारांनी आपटली. 23 एप्रिल रोजी भाव 2500 रुपयांनी कोसळला. बुधवारी 100 रुपयांनी भाव उतरले. तर 25 एप्रिल रोजी 400 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 82,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,094 रुपये, 23 कॅरेट 71,805 रुपये, 22 कॅरेट सोने 66,038 रुपये झाले. 18 कॅरेट 54,071 रुपये, 14 कॅरेट सोने 42,175 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 80,898 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते