नवी दिल्ली | 26 सप्टेंबर 2023 : सोने-चांदीला सप्टेंबर महिन्यात मोठी उसळी मारता आलेली नाही. महिन्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली. ही घसरण दीड आठवडा होती. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी दबाव झुगारत दोन्ही धातूंनी आगेकूच केली. सलग पाच दिवस सोने-चांदीतील आगेकूच सुरु असल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. सोन्यात 700 रुपयांची दरवाढ झाली तर चांदीमध्ये 1200 रुपयांपर्यंत उसळी आली. गेल्या शुक्रवारपासून पुन्हा चढउताराचे सत्र आहे. सप्टेंबर महिन्यात मौल्यवान धातूंना कमाल करता आली नाही. त्यांना रेकॉर्ड गाठता आलेला नाही. सराफा बाजारात सोने-चांदीचा (Gold Silver Price Today 26 September 2023) असा भाव आहे. किंमती इतक्या वधारल्या आहेत. पुढील महिन्यात नवीन रेकॉर्ड होतो, की किंमतीत घसरण होते, ते समोर येईल.
आठवड्याची सुरुवात घसरणीने
गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्यात सोन्याची दमछाक झाली. सुरुवातीला घसरणीचे सत्र होते. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी सोन्यात प्रत्येकी 200 रुपयांची वाढ झाली. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी वधारले. 19 सप्टेंबर रोजी 150 रुपयांनी दर वधारले. पाच दिवसांत सोन्यात वाढ झाली. 21 सप्टेंबर रोजी किंमती 150 रुपयांनी स्वस्त झाल्या. 22 सप्टेंबर रोजी किंचित घसरण आली. 23 सप्टेंबर रोजी 100 रुपयांची वाढ झाली. 24 सप्टेंबर रोजी भावात बदल झाला नाही. 22 कॅरेट सोने 55100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.
दरवाढीनंतर चमक फिक्की
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांदी 5000 रुपयांनी स्वस्त झाली होती. 22 सप्टेंबर रोज चांदीत एक हजारांची वाढ झाली. 23 सप्टेंबर रोजी 300 रुपयांनी भाव वधारले. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी चांदी 1200 रुपयांनी वधारली. तर 18 सप्टेंबर रोजी चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. 19 सप्टेंबर रोजी चांदी 300 रुपयांनी महागली. 20 सप्टेंबर रोजी 300 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 24 सप्टेंबर रोजी भावात बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 75,800 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट असा आहे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 59,129 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,892 रुपये, 22 कॅरेट सोने 54162 रुपये, 18 कॅरेट 44,347 रुपये, 14 कॅरेट सोने 34,590 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,015 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.