या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. दोन्ही धातूंमध्ये चढउताराचे सत्र होते. पण किंमतीतील घसरण ग्राहकांच्या पथ्यावर पडली. त्यांना कमी दराने मौल्यवान धातूंची खरेदी करता आली. मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात सोन्याने सर्वकालीन उच्चांकी भाव नोंदवला. सध्या त्याच भावाच्या आसपास ग्राहकांना बेशकिंमती धातूंची खरेदी करावी लागत आहे. जागतिक बाजारात आणखी एका युद्धाचे मळभ हटल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला. चांदीने गेल्या 10 दिवसांतील नरमाईला ब्रेक दिला. चांदी 2000 रुपयांनी वधारली. तर सोन्याने पण मुसंडी मारली, अशा आहेत सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 27 April 2024)
स्वस्ताईनंतर मुसंडी
या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. सोने या आठवड्यात 2400 रुपयांनी स्वस्त झाले. तर हजार रुपयांनी महागले. 22 एप्रिलला सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले.23 एप्रिल रोजी 1530 रुपयांनी भाव आपटला.बुधवारी 450 रुपयांनी सोने वधारले. 25 एप्रिल रोजी 350 रुपयांनी किंमती उतरल्या. 26 एप्रिल रोजी 400 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने मरगळ झटकली
गेल्या नऊ दिवसांपासून चांदीत पडझड सुरु होती. मागील आठवड्यात चांदीत 500 रुपयांची घसरण झाली होती. इतर दिवशी किंमती जैसे थे होत्या. या आठवड्यात 22 एप्रिलला चांदी हजारांनी आपटली. 23 एप्रिल रोजी चांदी 2500 रुपयांनी घसरली. बुधवारी 100 रुपयांनी भाव उतरले. तर 25 एप्रिलला 400 रुपयांची घसरण झाली. 26 एप्रिल रोजी किंमती दोन हजारांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,448 रुपये, 23 कॅरेट 72,158 रुपये, 22 कॅरेट सोने 66,362 रुपये झाले. 18 कॅरेट 54,336 रुपये, 14 कॅरेट सोने 42,382 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 81,374 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
हॉलमार्कनुसार कॅरेट