Gold Silver Rate Today : सोने-चांदीची आठवडाभरात मुसंडी! इतक्या वाढल्या किंमती

| Updated on: Aug 27, 2023 | 9:38 AM

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने या आठवड्यात भरारी घेतली. या महिन्यात सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. ही कसर एका आठवड्यात भरुन काढण्याचा प्रयत्न दोन्ही धातूंनी केला. इतक्या रुपयांनी आठवड्यात किंमती वाढल्या.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची आठवडाभरात मुसंडी! इतक्या वाढल्या किंमती
Image Credit source: स्त्रोत : गुगल
Follow us on

नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : अमेरिकने केंद्रीय बँकेने अपेक्षप्रमाणे व्याजदरात बाबत आक्रमक धोरण कायम ठेवले. त्याचा परिणाम जागतिक बाजारात दिसणार आहे. पण या आठवड्यात सोने-चांदीने डॉलरचा दबाव झुगारुन आगेकूच केली. पुढील महिन्यात भारतात सणासुदीचा काळ सुरु होत आहे. या काळात सोने-चांदी काय जलवा दाखवते, किती आगेकूच करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थात या दोन्ही धातूंवर जागतिक घडामोडींचा प्रभाव असेलच. मे आणि जून महिन्यात सोने-चांदीला (Gold-Silver Price Today 27 August 2023) मोठी झेप घेता आली नव्हती. तर जुलै महिन्यात सोने-चांदीने मुसंडी मारली होती. ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस पडझड सुरु होती. पण या आठवड्यात सोने-चांदी सूसाट होते. दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतली. चांदीने लांब पल्ला गाठला. सोन्याने पण चांगली कामगिरी बजावली.

IBJAकडून भाव जाहीर नाही

भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.

हे सुद्धा वाचा

430 रुपयांची वाढ

  1. सोन्यात 1, 5 ऑगस्ट रोजी सोन्यात 100-150 रुपयांची वाढ झाली.
  2. 21 ऑगस्ट रोजी सोने 50 रुपयांनी वाढले
  3. 23 ऑगस्ट रोजी किंमतींनी 180 रुपयांची उसळी घेतली
  4. 24 ऑगस्ट रोजी सोन्यात 200 रुपयांची वाढ झाली.
  5. 25 ऑगस्ट रोजी दरवाढीला ब्रेक लागला.
  6. 22 कॅरेट सोने 54,650 रुपये प्रति 10 ग्रॅम
  7. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव
  8. गुडरिटर्न्सने ही आकडेवारी दिली आहे.

चांदीत 4000 हून अधिक वाढ

  1. 16 ऑगस्ट रोजी भाव 200 रुपयांनी वाढले होते
  2. 18 ऑगस्ट रोजी चांदीने 1000 रुपयांची चढाई केली
  3. 19 ऑगस्ट रोजी चांदी 200 रुपयांनी घसरली
  4. 21 ऑगस्ट रोजी किंमती पुन्हा 200 रुपयांनी वधारल्या
  5. 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांची वाढ झाली
  6. 23 ऑगस्ट रोजी किंमती पुन्हा 500 रुपयांनी वधारल्या
  7. 24 ऑगस्ट रोजी चांदीने 1600 रुपयांची मोठी झेप घेतली
  8. 26 ऑगस्ट रोजी किंमती 500 रुपयांनी वधारल्या
  9. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,900 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 58,720 रुपये, 23 कॅरेट 58,485 रुपये, 22 कॅरेट सोने 53,788 रुपये, 18 कॅरेट 44040 रुपये, 14 कॅरेट सोने 34,351 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 73,695रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.