सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने दिवाळीला दोन्ही धातु नवीन विक्रम करणार अशी दाट शक्यता होती. अर्थात दिवाळी आता तोंडावर आली आहे. पण त्यापूर्वी या मौल्यवान धातुत विक्रमी घसरण झाली. ग्राहकांना हा मोठा सुखद धक्का होता. बेशकिंमती धातुत मोठी उलाढाल होण्याची शक्यता असताना अचानक दर घटले. ग्राहकांची पावलं आपोआप सराफा पेठांकडे वळालीत. सराफा बाजारात एकच गर्दी झाली. रविवार असल्याने आणि भाव उतरल्याने दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यात येईल. या विक्रमी घसरणीने सोने आणि चांदीची अशी आहे आता किंमत (Gold Silver Price Today 27 October 2024 )
सोन्यात आली स्वस्ताई
मागील 10 दिवसांत सोने 2250 रूपयांनी वाढले. गुरुवारी त्यात अचानक 600 रूपयांची घसरण झाली. आठवड्याच्या सुरुवातीला 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे 220 रूपये आणि 430 रुपयांनी सोने महागले. 24 ऑक्टोबरला सोने 600 रूपयांनी स्वस्त झाले. शुक्रवारी त्यात 100 रुपयांची वाढ दिसून आली. शनिवार आणि रविवारचे भाव अपडेट झाले नाहीत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत विक्रमी घसरण
मागील 10 दिवसांत चांदीने 7,500 रुपयांची उसळी घेतली होती. तर या आठवड्यात 21 ऑक्टोबरला 1500 रुपये, 22 ऑक्टोबर रोजी 1,000, 23 ऑक्टोबरला 2,000 रुपयांनी चांदी महागली. त्यानंतर चांदीत मोठा उलटफेर झाला. 24 आणि 25 ऑक्टोबरला अनुक्रमे 2,000 आणि 4 हजारांनी चांदी आपटली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,000 रुपये झाला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,015, 23 कॅरेट 77,703, 22 कॅरेट सोने 71,462 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,511 रुपये, 14 कॅरेट सोने 45,639 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,800 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.