या आठवड्यानंतर बऱ्याच दिवसानंतर सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र पाहिले. गेल्या दोन महिन्यात मौल्यवान धातूंनी ग्राहकांची बोबडी वळवली आहे. या धातूंनी आतापर्यंतचे भाववाढीचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले आहेत. दोन्ही धातूंची घौडदौड सुरु असताना या आठवड्यात तुफान दरवाढील खऱ्या अर्थाने ब्रेक लागला. इराण-इस्त्राईल यांच्यात युद्ध न भडकल्याने ही दरवाढ टळल्याचे मानले जात आहे. पण चीनमधील ग्राहक सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याने जागतिक बाजारात भाव चढेच आहेत. आठवड्याच्या शेवटी सोन्याने ग्राहकांना दणका दिला. तर चांदीत घसरण आली. आता सराफा बाजारात सोने-चांदीच्या अशा आहेत किंमती…(Gold Silver Price Today 28 April 2024)
अखेरच्या सत्रात बॅटिंग
या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. या 5 दिवसांत सोने 2400 रुपयांनी घसरले तर 1150 रुपयांनी महागले. 22 एप्रिल रोजी किंमती 550 रुपयांनी उतरल्या. 23 एप्रिलला 1530 रुपयांची मोठी घसरण झाली. 24 एप्रिल रोजी भाव 450 रुपयांनी वाढले. गुरुवारी सोने 350 रुपयांनी स्वस्त झाले. 26 एप्रिल रोजी 400 तर 27 एप्रिलला 200 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुसंडीनंतर चांदीची माघार
चांदीने दोन आठवड्यात मोठा दिलासा दिला. किंमती जैसे थे होत्या. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी चांदी 1,000 रुपयांनी स्वस्त झाली. 23 एप्रिल रोजी 2500 रुपयांची मोठी घसरण झाली. बुधवारी 100 रुपयांनी भाव उतरले. 25 एप्रिल रोजी चांदी 400 रुपयांनी घसरली. शुक्रवारी चांदीने 2,000 रुपयांची मुसंडी मारली. तर 27 एप्रिल रोजी 500 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,448 रुपये, 23 कॅरेट 72,158 रुपये, 22 कॅरेट सोने 66,362 रुपये झाले. 18 कॅरेट 54,336 रुपये, 14 कॅरेट सोने 42,382 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 81,374 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
9 वर्षांचे गणित काय?
वर्ष 2015 मध्ये सोन्याचा भाव 24,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. या किंमतींन तिप्पट होण्यासाठी 9 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला. त्यापूर्वी पण सोन्याच्या किंमती 9 वर्षांच्या कालावधीत तिप्पट झाल्या होत्या. वर्ष 2006 मध्ये सोन्याचा भाव 8,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमतींना तिप्पट होण्यासाठी जवळपास 19 वर्षे लागली होती. वर्ष 1987 मध्ये सोन्याचा भाव 2,570 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमती तिप्पट होण्यासाठी 8 वर्षे आणि 6 महिने लागले होते.