नवी दिल्ली | 28 February 2024 : या आठवड्याच्या सुरुवातीला ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. किंमती घसरल्याने ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली आहे. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत होता. किंमती प्रत्येक दिवशी बदलत होत्या. त्यामुळे ग्राहक खरेदीबाबत सांशक होता. या आठवड्यात चांदीत जवळपास हजार रुपयांची स्वस्ताई आली आहे. तर सोन्याच्या किंमतींनी पण दिलासा दिला आहे. सोने-चांदीची (Gold Silver Price Today 28 February 2024) जाणून घ्या किंमत
सोने झाले स्वस्त
गेल्या आठवड्यात चढउताराचे सत्र असल्याने सोन्याचा भाव प्रत्येक दिवशी बदलत होता. गेल्या बुधवारी म्हणजे 21 फेब्रुवारीला सोने 250 रुपयांनी महागले. तर 22 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांनी भाव उतरले होते. 24 फेब्रुवारी रोजी त्यात 200 रुपयांची वाढ झाली होती. तर 26 फेब्रुवारी रोजी सोने 160 रुपयांनी स्वस्त झाले. मंगळवारी हाच भाव कायम होता. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
ग्राहकांची झाली चांदी
गेल्या आठवड्यात चांदी 2200 रुपयांनी उतरली होती. गेल्या बुधवारी, 21 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांनी चांदी महागली. तर आता 22 फेब्रुवारी रोजी 700 आणि 23 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांची पडझड झाली. 24 फेब्रुवारीला किंमतीत 400 रुपयांची वाढ झाली होती. या आठवड्यात सुरुवातीलाच 26 फेब्रुवारीला चांदी 400 रुपयांनी स्वस्त झाली. 27 फेब्रुवारीला 500 रुपयांची पडझड झाली. आज सकाळच्या सत्रात पण घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,900 रुपये आहे.