देशात गेल्या 10 वर्षांत सोने आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या. अचानक मौल्यवान धातूच्या किंमती इतक्या कशा वधारल्या याचं सर्वसामान्य नागरिकांना मोठं कोडं आहे. दहा वर्षांपूर्वी 30 हजारांच्या घरात असलेले सोने आता थेट 70 हजारांच्या वर गेल्याने चिंता वाढली होती. चांदी पण लाखांच्या घरात जाते की काय अशी स्थिती आहे. पण जून महिन्यात दरवाढीला मोठा ब्रेक लागला आहे. चीनसह इतर सरकारी बँकांनी सोन्याची खरेदी थांबवल्याचा परिणाम दिसून येत आहे. तर येत्या बजेटमध्ये केंद्र सरकार आयात शुल्कात कपात करण्याचे धोरण राबविण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने 3,000 रुपयांनी तर चांदी 3800 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या काय आहे मौल्यवान धातूचा भाव? (Gold Silver Price Today 28 June 2024 )
सोन्यात आली स्वस्ताई
आता हा तिसरा आठवडा आहे, ज्यात सोन्याला मोठी कामगिरी बजावता आली नाही. गेल्या दोन आठवड्यात किंमतीत चढउताराचे सत्र होते. या आठवड्यात तर किंमती अद्याप वधारल्या नाहीत. 24 जून रोजी सोने 150 रुपयांनी उतरले. 25 जूनला भाव जैसे थे होता. 26 जूनला त्यात 230 रुपयांची स्वस्ताई आली. 27 जून रोजी 270 रुपयांनी भाव उतरला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत मोठी घसरण
गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही चांदीला विक्रम करता आला नाही. 24 जून रोजी 300 रुपये, 25 जूनला 700 रुपये अशी एकूण 1000 रुपयांनी चांदी उतरली. 26 जूनला किंमती पुन्हा हजारांनी उतरल्या. गुरुवारी भावात बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारले. 24 कॅरेट सोने 71,391 रुपये, 23 कॅरेट 71,105 रुपये, 22 कॅरेट सोने 65,394 रुपये झाले. 18 कॅरेट 53,543 रुपये, 14 कॅरेट सोने 41,764 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 87,043 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.