जून महिना ग्राहकांना पावला आहे. या महिन्यात सोने आणि चांदीला मोठा विक्रम करता आला नाही. हा महिना उद्या संपले. या महिन्यात मौल्यवान धातुत चढउताराचे मोठे सत्र दिसले नाही. गेल्या तीन आठवड्यात तर सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा आहे. या आठवड्यात बेशकिंमती धातूत घसरण झाली होती. आठवड्याच्या अखेरीस सोन्याने मुसंडी मारली. तर चांदीचा भाव स्थिर आहे. असा आहे या धातूचा भाव? (Gold Silver Price Today 29 June 2024 )
सोन्याची मुसंडी
गेल्या तीन आठवड्यापासून सोन्यात मोठी उसळी दिसली नाही. . 24 जून रोजी सोने 150 रुपयांनी स्वस्त झाले. 25 जूनला भावात बदल झाला नाही. 26 जूनला 230 रुपये, 27 जून रोजी 270 रूपयांनी भाव उतरला. तर आठवड्याच्या अखेरीस हा भाव 450 रुपयांनी वाढला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा भाव जैसे थे
चांदीत नरमाईचे धोरण सुरु आहे. 24 जून रोजी 300 रुपये, 25 जूनला 700 रुपये अशी एकूण 1000 रुपयांनी चांदी घसरली. 26 जूनला 1000 रुपयांनी भाव उतरले. गेल्या दोन दिवसांपासून भावात बदल दिसला नाही. 27,28 जून रोजी भावात कोणताही बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,000 रुपये आहे.
जळगावच्या सराफ बाजारात भाव काय
गेल्या पंधरवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असल्याचे समोर येते आहे. गुरुवारी 71 हजार 900 रुपये प्रतितोळा असलेले सोन्याचे दर शुक्रवारी400 रुपयांनी वाढून 72 हजर 300 रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे चांदीचे दर गुरुवारच्या तुलनेत किलोमागे एक हजार रुपयांनी वाढून 89000 रुपयांवर पोहोचले. दरम्यान, आगामी आठवडाभरात कमी-अधिक प्रमाणात सोने-चांदी दर वाढू शकतात अशी शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारले. 24 कॅरेट सोने 71,835 रुपये, 23 कॅरेट 71,547 रुपये, 22 कॅरेट सोने 65,801 रुपये झाले. 18 कॅरेट 53,876 रुपये, 14 कॅरेट सोने 42,024 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,000 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.