श्रावण महिना आता सुरु होत आहे. त्यापूर्वीच सोने आणि चांदीने मुसंडी मारली. या आठवड्यात मौल्यवान धातूच्या किंमतींनी ग्राहकांच्यात तोंडच पाणी पळवले. या आठवड्याच्या अखेरीस हे धातूत खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहे. 23 जुलै सादर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मौल्यवान धातूवरील सीमा शुल्कात कपातीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर किंमतीत विक्रमी पडझड झाली. तर आता या आठवड्यात या धातूंनी मोठी झेप घेतली. ग्राहकांना सराफा बाजारात 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी दोन हजार जादा मोजावे लागतील तर चांदी खरेदीसाठी किलोमागे 2,800 रुपयांच्या आसपास अधिक रक्कम मोजावी लागेल. काय आहेत आता बेशकिंमती धातूच्या किंमती? (Gold Silver Price Today 3 August 2024 )
सोन्याचा चढता आलेख
या आठवड्यात सोन्याने दमदार कामगिरी बजावली. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी घसरणीवर असलेले सोने महागले. 29 जुलै रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. दुसऱ्या दिवशी किंमती 210 रुपयांनी कमी झाल्या. 31 जुलै रोजी सोन्याने 870 रुपयांची विक्रमी झेप घेतली. 1 ऑगस्ट रोजी 540 रुपयांची मुसंडी मारली. तर 2 ऑगस्ट रोजी भाव 330 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची जोरदार बॅटिंग
बजेटपूर्वी आणि नंतर चांदीत मोठी घसरण झाली होती. या आठवड्यात 29 जुलै रोजी चांदी 500 रुपयांनी वधारली. मंगळवारी भावात तितकीच घसरण झाली. 31 जुलै रोजी चांदीने 2 हजारांची वाढ नोंदवली. 1 ऑगस्टला चांदी 600 रुपये तर 2 ऑगस्ट रोजी त्यात 100 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,200 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 70,392, 23 कॅरेट 70,110, 22 कॅरेट सोने 64,479 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 52,794रुपये, 14 कॅरेट सोने 41,179 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 83,501 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.