Gold Silver Rate Today | सोने महागाईवर स्वार! चांदीची झेप पल्लेदार, असे वाढले भाव

| Updated on: Mar 03, 2024 | 8:32 AM

Gold Silver Rate Today 3 March 2024 | या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सोने आणि चांदीने मोठी उसळी घेतली. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात, मार्चमध्ये मौल्यवान धातूच्या किंमती उसळी घेण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात या धातूंना मोठी कमाल दाखवता आली नाही. मार्चमध्ये कदाचित भाव वधारु शकतात.

Gold Silver Rate Today | सोने महागाईवर स्वार! चांदीची झेप पल्लेदार, असे वाढले भाव
Follow us on

नवी दिल्ली | 3 March 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला होता. तर अखेरच्या सत्रात दोन्ही धातूंनी पल्लेदार झेप घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत किंमती झपझप वाढल्या आहेत. मौल्यवान धातूंनी चढाई केली आहे. चांदी तीन दिवसांत 1100 रुपयांनी वधारली तर सोन्याने पण मोठा पल्ला गाठला आहे. चालू आर्थिक वर्षातील अखेरच्या महिन्यात, मार्चमध्ये सोने-चांदी महागण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात तेजीचे सत्र आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे शेअर बाजारानंतर परदेशी गुंतवणूकदार सोने-चांदीला अधिक गुंतवणुकीची शक्यता आहे. सोने-चांदीची किंमत (Gold Silver Price Today 3 March 2024) जाणून घ्या…

सोन्याचा टॉप गिअर

या आठवड्यात सोन्यात स्वस्ताईचे सत्र होते. अखेरच्या सत्रात किंमती वधारल्या. 26 फेब्रुवारीला सोने 160 रुपयांनी उतरले. 29 फेब्रुवारीला किंमतीत जैसे थे होत्या. 1 मार्च रोजी 300 रुपयांनी किंमती वधारल्या. आता जवळपास 800 रुपयांची रेकॉर्डब्रेक चढाई केल्याचा दावा गुडरिटर्न्सने केला आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 1100 रुपयांनी महाग

मागील दोन आठवड्यात चांदी 3400 रुपयांनी स्वस्त झाली होती. 26 फेब्रुवारी रोजी किंमती 400 रुपयांनी उतरल्या. 27 फेब्रुवारीला 500 रुपयांनी भाव कमी झाले. 28 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांची स्वस्ताई आली. तर 29 फेब्रुवारी रोजी 300 रुपयांनी किंमती वधारल्या. 1 मार्च रोजी पण तितकीच वाढ झाली. 2 मार्च रोजी किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली. 24 कॅरेट सोने 62,816 रुपये, 23 कॅरेट 62,564 रुपये, 22 कॅरेट सोने 57,540 रुपये झाले.18 कॅरेट 47,112 रुपये, 14 कॅरेट सोने 36,747 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,898 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.