Gold Silver Rate Today : दाणादाण सुरुच! सोने-चांदी पुन्हा आपटले, इतके झाले स्वस्त

| Updated on: Oct 03, 2023 | 8:44 AM

Gold Silver Rate Today : नेमकं पितृपक्षात सोने-चांदीने खरेदीदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. याच काळात भावात मोठी पडझड झाली आहे. या पडझडीमागे हे पण एक मोठे कारण आहे. मागणी घटल्याचा पण परिणाम भावावर झाला आहे. गेल्या आठवड्यात सोने-चांदीची चमक फिक्की पडली. तर या आठवड्याच्या सुरुवातीलाच घसरणीची वार्ता येऊन धडकली.

Gold Silver Rate Today : दाणादाण सुरुच! सोने-चांदी पुन्हा आपटले, इतके झाले स्वस्त
Follow us on

नवी दिल्ली | 3 ऑक्टोबर 2023 : सप्टेंबरच्या शेवटच्या सत्रात सोने-चांदीचा भाव दणकावून आपटला. ऑक्टोबरच्या पहिल्या सत्रातच सोने-चांदी नापास झाले. भावात पुन्हा मोठी घसरण झाली. सोने-चांदी स्वस्ताईमागे जागतिक घडामोडी आहेत, तशाच काही स्थानिक कारणांचा समावेश आहे. सध्या पितृपक्ष सुरु आहे. अनेक भारतीय परंपरेप्रमाणे या काळात सोने-चांदीची खरेदी करत नाही. मागणी घटल्याचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही धातूमधील हा घसरण ग्राहकांच्या पथ्यावर पडत आहे. काही तज्ज्ञांनी तर सोने आणि चांदीत दिवाळीपर्यंत आणखी घसरणीचा अंदाज वर्तवला आहे. दोन्ही धातूंचा डॉलरसमोर निभाव लागणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्या सोने-चांदीचा भाव (Gold Silver Rate Today 3 October 2023 ) असा आहे.

सोन्याची चमक फिक्की

गुडरिटर्न्सनुसार, गेल्या महिन्यात सोन्याला कामगिरी बजावता आली नाही. 15 ते 19 सप्टेंबर या काळातच सलग तेजीचे सत्र, 700 रुपयांनी सोने वधारले होते. त्यापूर्वी आणि अखेरच्या सत्रात घसरणीचे सत्र होते. 28 सप्टेंबर रोजी सोन्यात 650 रुपयांची स्वस्ताई आली. 29 सप्टेंबर रोजी सोने 250 रुपयांनी घसरले. 30 सप्टेंबर रोजी सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले. तर 1 ऑक्टोबर रोजी मोठा बदल झाला नाही. 2 ऑक्टोबर रोजी सोने 150 रुपयांनी घसरले. 22 कॅरेट सोने 53,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,190रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

हे सुद्धा वाचा

चांदी पुन्हा स्वस्त

गेल्या महिन्यात चांदीला मोठी मजल मारता आली नाही. पहिल्या सत्रात चांदीत 5000 रुपयांची घसरण झाली. 22 तारखेला 1 हजारांनी किंमती वधारल्या. 27 सप्टेंबर रोजी 600 तर 28 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी चांदी घसरली. 29 सप्टेंबर रोजी हजार रुपयांनी भाव वधारले. 30 सप्टेंबर रोजी चांदीत 1200 रुपयांची स्वस्ताई आली. 1 ऑक्टोबर रोजी भाव जैसे थे होते. 2 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 73,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट असा आहे भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 57,719 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 57,488 रुपये, 22 कॅरेट सोने 52,871 रुपये, 18 कॅरेट 43,289 रुपये, 14 कॅरेट सोने 33,766 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,603 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.