Gold Silver Rate Today 3 October 2024 : घटस्थापनेला सोने-चांदीचा दरवाढीचा मुहूर्त; मौल्यवान धातुत दाखवणार नवरंग? किती वाढल्या किंमती?

| Updated on: Oct 03, 2024 | 8:37 AM

Gold Silver Rate Today 3 October 2024 : सप्टेंबरच्या पंधरवाड्यात सोने आणि चांदीने दरवाढीचा उच्चांक गाठला. दोन्ही धातुनी घसरणीसोबतच महागाईचा गड चढला. आता नवरात्रोत्सवात सोने आणि चांदी नवरंग दाखवणार का? मौल्यवान धातुत किंमती वाढतील की कमी होतील? सध्या काय आहेत दर?

Gold Silver Rate Today 3 October 2024 : घटस्थापनेला सोने-चांदीचा दरवाढीचा मुहूर्त; मौल्यवान धातुत दाखवणार नवरंग? किती वाढल्या किंमती?
किती वाढल्या सोने-चांदीच्या किंमती?
Follow us on

जगात युद्धाचा भडका उडला आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच आता हमास-इस्त्रायल, इराण-इस्त्रायल, लेबनॉन-इस्त्रायल अशा अनेक आघाड्यांवर युद्ध भडकले आहे. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर पडला आहे. आजपासून नवरात्रोत्सवाला आरंभ झाला आहे. सप्टेंबरच्या पंधरवाड्यात सोने आणि चांदीने दरवाढीचा उच्चांक गाठला. दोन्ही धातुनी घसरणीसोबतच महागाईचा गड चढला. आता नवरात्रोत्सवात सोने आणि चांदी नवरंग दाखवणार का? मौल्यवान धातुत किंमती वाढतील की कमी होतील? सध्या काय आहेत दर? (Gold Silver Price Today 3 October 2024 )

घसरणीनंतर सोने पुन्हा वधारले

गेल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी महागले होते. 30 सप्टेंबर रोजी सोने 160 रुपयांनी उतरले होते. तर 1 ऑगस्ट रोजी त्यात 330 रुपयांनी सोने स्वस्त झाले होते. तर 2 ऑक्टोबर रोजी सोन्याने 540 रुपयांची मुसंडी मारली. आजही सकाळच्या सत्रात मौल्यवान धातुत वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीला सूर गवसेना

मागील दोन आठवड्यात चांदी 6,000 रुपयांनी वाढली. पण 29 सप्टेंबरपासून चांदी चिरनिद्रेत आहे. तिची झोप काही उडालेली नाही. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात कोणताही बदल झालेला नाही. तर आज 3 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,515, 23 कॅरेट 75,213, 22 कॅरेट सोने 69,172 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,636 रुपये, 14 कॅरेट सोने 44,176 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,882 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.