मार्च नंतर एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने तुफान फटकेबाजी केली. सर्वकालीन रेकॉर्ड याच महिन्यात नोंदविला गेला. गेल्यावर्षी सुद्धा एप्रिल आणि मे महिन्यात भाव वधारले होते. अक्षय तृतीया आता तोंडावर आहे. तर एप्रिल महिना संपणार आहे. या महिन्यात किंमती भडकल्याने ग्राहकांनी गरजेपुरती खरेदी केली. पण कमाल किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे. अक्षय तृतीयेवर या नाराजीचे सावट असू शकते. World Gold Council नुसार, किंमतींचा एकच भडका उडाल्याने मागणीवर त्याचा परिणाम दिसू शकतो. एप्रिलच्या अखेरच्या सत्रात अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 30 April 2024)
अखेरच्या सत्रात चढउताराचे सत्र
गेल्या आठवड्यात सोने 2400 रुपयांनी उतरले तर 1150 रुपयांनी महागले. एप्रिलच्या अखेरीस सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. एप्रिलचा दरवाढीचा आलेख पाहता अखेरच्या सत्रात ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे दिसून येते. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 30 एप्रिल रोजी सोने 300 रुपयांनी घसरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने घेतली माघार
एप्रिलच्या अखेरच्या सत्रात चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. दोन आठवड्यात चांदीने माघार घेतली. गेल्या आठवड्यात एकदाच चांदीने 2 हजारांची उसळी घेतली. तर 4500 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदीच्या किंमती स्थिर होत्या.
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 72,373 रुपये, 23 कॅरेट 72,083 रुपये, 22 कॅरेट सोने 66,294 रुपये झाले. 18 कॅरेट 54,280 रुपये, 14 कॅरेट सोने 42,339 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 81,128रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.