गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या आघाडीवर शांतता होती. 23 जुलै रोजी बजेट सादर झाल्यानंतर या मौल्यवान धातूत विक्रमी घसरण झाली. सीमा शुल्क कपातीचा निर्णय झाल्यानंतर हा परिणाम दिसून आला. दोन्ही धातूच्या किंमतीत कुठलीही वाढ दिसली नाही. गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने कूस बदलली. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने दरवाढीचा झेंडा रोवला. आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती? (Gold Silver Price Today 30 July 2024 )
सोन्यात दरवाढ
18 जुलैपासून सोन्यात घसरणीचे सत्र होते. अर्थसंकल्पानंतर त्यात अजून घसरण दिसली. गेल्या आठवड्याच्या अखेरीस 27 जुलै रोजी सोन्याच्या किंमतीत 270 रुपयांची वाढ झाली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला 160 रुपयांनी किंमत वाढली. आजही सकाळच्या सत्रात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 63,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत दरवाढ
मागील दोन आठवड्यापासून चांदीने दरवाढीला ब्रेक लावला आहे. बजेटनंतर चांदी 7,000 रूपयांनी स्वस्त झाली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने 500 रुपयांची आघाडी घेतली. आज सकाळच्या सत्रातही चांदीत दरवाढ दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 68,800, 23 कॅरेट 68,525, 22 कॅरेट सोने 63,021 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,600 रुपये, 14 कॅरेट सोने 40,248 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 82,192 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.