वर्षाच्या अखेरीस सोने आणि चांदीला मोठा करिष्मा दाखवता आली नाही. दोन्ही धातुना चमकदार कामगिरी करता आली नाही. गुडरिटर्न्सनुसार, यंदा 63-65 हजारावरून सोन्याने 81 हजारांचा तर चांदीने 1 लाखांचा टप्पा ओलांडला. 1 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 63,353 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. तर 1 जुलै रोजी सोने थेट 71 हजारांच्या घरात पोहचले. त्यानंतर त्याने दरमजल करत नाही तर अवघ्या काही महिन्यात 81 हजारांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस सोन्याला चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. चांदीने पण या वर्षात मोठी भरारी घेतली. चांदी वर्षाच्या सुरुवातीला 80 हजार रुपये किलोने विक्री झाली. तर य वर्षात चांदीने 1 लाखांचा टप्पा ओलांडला. 31 डिसेंबर रोजी ग्राहकांना मिळाला दिलासा की कापला खिसा? आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 29 December 2024 )
सोन्याच्या उच्चांकी घौडदौडीला ब्रेक
वर्षाच्या अखेरच्या महिन्यात सोन्याला चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. वर्षाचा विचार करता, सोन्याने मैदान मारले. या महिन्यात 9 ते 15 डिसेंबर दरम्यान सोन्याचा तोरा दिसला. अखरेच्या आठवड्यात सोने 650 रुपयांनी महागले. तर या आठवड्याच्या सुरुवातीला 30 डिसेंबर रोजी सोने 160 रुपयांनी वधारले. आज सकाळी सोन्याने दरवाढीचे संकेत दिले आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीला मोठ्या दरवाढीची प्रतिक्षा
या वर्षात चांदीने दमदार भरारी घेतली. किलोमागे जवळपास 15 हजारांच्या घरात उसळी नोंदवली. या महिन्यात चांदीला सूर गवसला नाही. जितक्या किंमती वाढल्या. तितकीच पडझड दिसली. गेल्या आठवड्यात चांदी 1,100 हजार रुपयांनी वाढली. तर 30 डिसेंबर रोजी चांदीत बदल दिसला नाही. वर्षाच्या अखेरच्या दिवशी 31 डिसेंबर रोजी घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,400 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,194, 23 कॅरेट 75,889, 22 कॅरेट सोने 69,794 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,146 रुपये, 14 कॅरेट सोने 44,574 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,175 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.