ऋतुचक्रानुसार, शिशिराचा शुष्क पण संपून निसर्गाने वसंताची आरती सुरु केलेली आहे. मौल्यवान धातूत पण वसंताचे आगमन झाले आहे. सोने आणि चांदी मार्च महिन्यात रेकॉर्डवर रेकॉर्ड करत आहेत. पण ही आगेकूच ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवणारी ठरली आहे. मार्च महिन्यात सुरुवातीच्या दहा दिवसांत सोन्याने 3,430 रुपयांची तर चांदीने 3 हजार रुपयांची मुसंडी मारली होती. त्यानंतर 21 मार्च रोजी सोन्याने 1,000 रुपयांची उसळी घेतली. तर चांदी 1500 रुपयांनी वधारली. शनिवारी 29 मार्च रोजी सोन्यात 1300 रुपयांची दरवाढ झाली. त्यामुळे सोने लवकरच 75 हजारी मनसबदार होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. काय आहे सोने आणि चांदीचा (Gold Silver Price Today 31 March 2024) भाव?
सोन्याची घौडदौड
या आठवड्यात 26 मार्चला सोन्यात 100 रुपयांनी उतरले. 27 मार्च रोजी 200 रुपयांनी वधारले. 28 मार्च रोजी सोने 350 रुपयांनी उसळेल.. तर 29 मार्च रोजी 1300 रुपयांची विक्रमी उडी सोन्याने नोंदवली. 30 मार्च रोजी त्यात 250 रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 62,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 68,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत 800 रुपयांची वाढ
या आठवड्यात चांदीच्या किंमतीत चढउतार दिसून आला. 25 मार्चला चांदी 300 रुपयांनी महागली. 26 मार्च रोजी भाव तितकाच खाली आला. 27 मार्च रोजी किंमती 300 रुपयांनी उतरल्या. तर 28 आणि 29 मार्च रोजी सलग 300 रुपयांची वाढ झाली. 30 मार्च रोजी किंमती 200 रुपयांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 78,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने दरवाढीची सलामी दिली. 24 कॅरेट सोने 67,252 रुपये, 23 कॅरेट 66,983 रुपये, 22 कॅरेट सोने 61,603 रुपये झाले.18 कॅरेट 50439 रुपये, 14 कॅरेट सोने 39,342 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,127 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
हॉलमार्कनुसार कॅरेट