सरत्या वर्षात दिलासा देणाऱ्या सोने आणि चांदीने ग्राहकांना वर्षाच्या सुरूवातीलाच मोठ दणका दिला. या धातुनी दिवसाच ग्राहकांना तारे दाखवले. दोन्ही मौल्यवान धातुनी महागाईची तुतारी फुंकली. या मौल्यवान धातुचा वारू उधळल्याने ग्राहकाच्या तोंडचे पाणी पळाले. तीनच दिवसांत सोने हजार रुपयांहून अधिकने महागले. या वर्षाची सुरूवात महागाईने झाल्याने ग्राहकांचा खिसा कापला गेला. त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस सराफा बाजारात खरेदीसाठी जाणार असाल तर खिसा गरम ठेवा. मौल्यवान धातुची आताची किंमत जाणून घ्या. (Gold Silver Price Today 4 January 2025 )
सोन्याची जोरदार मुसंडी
गेल्या वर्षात 31 डिसेंबर रोजी सोने 440 रुपयांनी सोने स्वस्त झाले होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2025 रोजी सोने 440 रुपयांनी, 2 जानेवारीला 330 रूपयांनी तर 3 जानेवारी रोजी 870 रूपयांनी महागले. तीन दिवसांत 1,640 रुपयांची उसळी दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत.
चांदीची दोन हजारांची मुसंडी
गेल्या आठवड्यात चांदी 1,100 हजार रुपयांनी महागली होती. तर 30 डिसेंबरला किंमती बदलली नाही. 31 डिसेंबर रोजी चांदी 1900 रुपयांनी स्वस्त झाली. 1 आणि 2 जानेवारी 2025 रोजी किंमतीत बदल दिसला नाही. 3 जानेवारी रोजी चांदी 2 हजारांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,504, 23 कॅरेट 77,194, 22 कॅरेट सोने 70,994 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,128 रुपये, 14 कॅरेट सोने 45,340 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 88,121 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.