Gold Silver Rate Today : खरेदीची करा लगबग, सोने-चांदी उतरले झरझर

| Updated on: Oct 05, 2023 | 8:41 AM

Gold Silver Rate Today : सोने-चांदीत घसरण सुरुच आहे. सोने थोडे सावरले आहे तर चांदीत पुन्हा मोठी घसरण झाली. दोन्ही धातूंमधील ही घसरण ग्राहकांच्या पथ्यावर पडली आहे. पण सध्या पितृपक्षामुळे अनेक जणांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सोने-चांदी घसरणीतही नवीन रेकॉर्ड करण्याचा दावा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Gold Silver Rate Today : खरेदीची करा लगबग, सोने-चांदी उतरले झरझर
Image Credit source: गुगल त्रिनिका
Follow us on

नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : सोने-चांदीने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता आणली. जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात दरवाढीचे नवनवीन रेकॉर्ड करणाऱ्या सोने-चांदीला गेल्या दहा महिन्यात फार मोठा पल्ला गाठता आला नाही. त्यात मे, जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर दोन्ही मौल्यवान धातू एका विशिष्ट किंमतीत चढउतार करत होते. सप्टेंबर महिन्यातही घसरण सुरु होती. आता ऑक्टोबर महिन्यात तर सोने-चांदीचा प्रवास निच्चांकाकडे सुरु आहे. दिवाळीपर्यंत सोने-चांदीचा उलटा प्रवास ग्राहकांना सुखद धक्का देण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते सोने-चांदी (Gold Silver Rate Today 5 October 2023) निच्चांकाचा रेकॉर्ड ब्रेक करतील, असे झाले तर ग्राहकांसाठी ती खरी दिवाळी असेल. सध्या सोने-चांदी इतके स्वस्त झाले आहे.

सोन्यात किंचित घसरण

गुडरिटर्न्सनुसार, 1 ऑक्टोबर रोजी मोठा बदल झाला नाही. 2 ऑक्टोबर रोजी सोने 150 रुपयांनी घसरले. 3 ऑक्टोबर रोजी भावात जवळपास 650 रुपयांची घसरण झाली. काल किंचित घसरण दिसून आली. यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत घसरण दिसून आली होती. मध्यंतरी 15 ते 19 सप्टेंबर या काळात तेजीचे सत्र आले. त्यानंतर सोने पुन्हा स्वस्त झाले. 22 कॅरेट सोने 52,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,530रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

हे सुद्धा वाचा

चांदी पुन्हा घसरली

चांदी माघारी फिरली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांदी 5000 रुपयांनी स्वस्त झाली होती. त्यानंतर थोडे तेजीचे सत्र आले. महिन्याच्या अखेरीस किंमती पुन्हा घसरल्या. 1 ऑक्टोबर रोजी भाव जैसे थे होते. 2 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. आता 3 ऑक्टोबर रोजी चांदी 2000 रुपयांनी उतरली. तर 4 ऑक्टोबर रोजी 300 रुपयांनी किंमती स्वस्त झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 70,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट असा आहे भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 56,653 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 56,426 रुपये, 22 कॅरेट सोने 51894 रुपये, 18 कॅरेट 42,490 रुपये, 14 कॅरेट सोने 33,142 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 67,446 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर


22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.