एकाच महिन्यात ग्राहकांना सोने आणि चांदीने दिवसा तारे दाखवले. गुडरिटर्न्सनुसार, एकाच महिन्यात 22 कॅरेट सोन्याला 24 कॅरेट सोन्याचा भाव आला. तर 24 कॅरेट सोन्याने किंमतीत नवीन विक्रम केला. एका महिन्यात देशातील सर्वच सराफा पेठांमध्ये या मौल्यवान धातूंनी कहर केला आहे. 3 टक्क्यांच्या जीएसटीनंतर हा आकडा तर गगनाला भिडतो. हौसेला सुद्धा अधिक मौल देण्याची इच्छा नसल्याने अनेक ग्राहक सराफा बाजारातून काढता पाय घेत आहे. सराफा पेठेत लग्नसराई आणि सणांचा शुभ मुहूर्त गाठण्यासाठी काही ग्राहकांनी घाई केली इतकेच. मार्च महिन्याप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या चार दिवसांत सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली. या चार दिवसांत सोन्याने 2300 रुपयांचा तर चांदीने 4,000 रुपयांचा टप्पा गाठला. 5 एप्रिल रोजीच्या घसरणीचा थोडाबहुत दिलासा मिळाला. आता आशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 6 April 2024)
एकाच महिन्यात मारली मुसंडी
सोने 450 रुपयांनी उतरले
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या चार दिवसांत सोन्याने तुफान फटकेबाजी केली. 1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांनी उसळले, 2 एप्रिल रोजी 250 रुपयांची भाव उतरले. 3 एप्रिलला सोने 750 रुपयांनी महागले. 4 एप्रिल रोजी 600 रुपयांची दरवाढ झाली. तर 5 एप्रिल रोजी 450 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी पण उतरली
एप्रिलच्या पहिल्याच दिवशी चांदीने टॉप गिअर टाकला. 1 एप्रिलला 600 रुपयांची दरवाढ नोंदवली. 2 एप्रिलला किलोमागे चांदीच्या किंमतीत 400 रुपयांची भर पडली. 3 एप्रिलला चांदीने 2 हजारांचा टॉप गिअर टाकला. 4 एप्रिल रोजी एक हजारांनी भाव वधारला. तर 5 एप्रिल रोजी किलोमागे 300 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 81,700 रुपयांपर्यंत खाली आला.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 69,882 रुपये, 23 कॅरेट 69,602 रुपये, 22 कॅरेट सोने 64,012 रुपये झाले.18 कॅरेट 52,412 रुपये, 14 कॅरेट सोने 40,881 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 79,096 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.