या आठवड्यात सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसले. सुरुवातीला दोन्ही धातुत स्वस्ताई आली. त्यानंतर किंमती वधारल्या. घसरणीनंतर आता आठवड्याच्या अखेरीस किंमतीत वाढ झाली आहे. येत्या जानेवारीत अमेरिकत सत्ता बदल होत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होतील. त्यांच्या विजयापासून लागलीच समीकरण बदलेली दिसली. दोन्ही धातु स्वस्त झाले होते. त्यात आता मोठी वाढ झाली आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर दोन्ही धातुच्या किंमतीत नरमाई येण्याची शक्यता आहे. युक्रेन-रशिया युद्ध थांबण्याचा दावा करण्यात येत आहे. तर मध्य-पूर्वेतही शांततेची बोलणी होण्याची शक्यता आहे. असे झाले तर महागाई आटोक्यात आणणे सर्वच देशांना सोपे होणार आहे. आता अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 6 December 2024 )
अखेरच्या टप्प्यात सोन्याची उसळी
या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसून आले. या सोमवारी सोने 650 रुपयांनी घसरले. तर मंगळवारी सोने 430 रुपयांनी वधारले. बुधवारी सोन्याच्या भाव जैसे थे होता. तर गुरूवारी सोन्यात 110 रुपयांची वाढ दिसली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,004 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची एक हजारी उसळी
मागील काही दिवसात चांदीला दरवाढीचा सूर गवसला नाही. चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. मागील आठवड्यात चांदीत जितकी उसळी आली. तितकीच घसरण झाली. या सोमवारी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. त्यानंतरच्या दोन दिवसांत चांदी सुस्तावली. 5 डिसेंबर रोजी चांदी 1 हजारांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,453, 23 कॅरेट 76,147, 22 कॅरेट सोने 70,031 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,340 रुपये, 14 कॅरेट सोने 44,725 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,210 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.