नवी दिल्ली | 6 जानेवारी 2024 : सोने-चांदीने वर्षाच्या सुरुवातीला उसळी घेतली असली तरी आता किंमतीत मोठी घसरण झाली आहे. डिसेंबर महिन्यात मौल्यवान धातूंनी कमाल दाखवली. किंमतींनी नवीन उच्चांक गाठला. सोने 66 हजारांच्या जवळपास पोहचले होते. तर चांदीने पण मोठा पल्ला गाठला होता. नवीन वर्षात दोन्ही धातूंची घौडदौड कायम होती. 3 जानेवारीपासून किंमतीत घसरण सुरु झाली. सलग तीन दिवसांपासून पडझडीचे सत्र सुरु आहे. या तीन दिवसांत सोने 900 रुपयांनी तर चांदी 2300 रुपयांनी घसरली. आता सोने-चांदीचा भाव काय? (Gold Silver Price Today 6 January 2024)
सोन्याचा मोठा दिलासा
डिसेंबर महिन्यात सोन्याचा किंमती उच्चांकावर पोहचल्या होत्या. सोने जवळपास 66 हजारांच्या घरात पोहचले होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला दरवाढ झाली. 2 जानेवारी 2024 रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. पण 3 जानेवारीला भाव 270 रुपयांनी घसरले. 4 जानेवारी रोजी भाव 440 रुपयांनी उतरले. 5 जानेवारी रोजी भावात 130 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची किंमत उतरली
गेल्यावर्षाच्या शेवटच्या महिन्यात चांदीत मोठी वाढ झाली होती. नवीन वर्षात दरवाढीचे सुरु होते. 2 जानेवारी 2024 रोजी चांदीचा दर 300 रुपयांनी वधारला. तर 3 जानेवारी रोजी 300 रुपयांनी किंमती घसरल्या. 4 जानेवारी रोजी भाव 2000 रुपयांनी उतरले. काल भावात मोठा बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,600 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,540 रुपये, 23 कॅरेट 62,290 रुपये, 22 कॅरेट सोने 57287 रुपये झाले. 18 कॅरेट 46,905 रुपये, 14 कॅरेट सोने 36,586 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,550 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.