मे महिन्यात सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली नाही. ग्राहकांना दिलासा मिळाला. सुरुवातीच्या पाच ते सहा दिवसांत सोने केवळ 400 रुपयांच्या घरात महागले तर त्यात जवळपास दोन हजार रुपयांची घसरण झाली. चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. किंचित वाढ आणि तितकीच चांदी स्वस्त झाली. 17 एप्रिलपासून चांदीला मोठी करामत दाखवता आलेली नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला, अक्षय तृतीयेच्या तोंडावर चांदीने 1 हजारांची भरारी घेतली तर सोने किंचित वाढले, काय आहेत या मौल्यवान धातूंची किंमत (Gold Silver Price Today 6 May 2024 ) जाणून घ्या…
सोन्याने कूस बदलली
गेल्या आठवड्यात सोने जवळपास 2 हजार रुपयांनी घसरले. तर त्यात 400 रुपयांच्या घरात दरवाढ दिसली. भावात मोठी उसळी आली नाही. मार्च आणि एप्रिलनंतर मे महिन्याची सुरुवात थंड होती. 6 मे रोजी सोने 200 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने घेतली उसळी
17 एप्रिलपासून चांदीला अजूनही मोठी भरारी मारता आली नाही. गेल्या आठवड्यात चांदीने नरमाईचा सुरु आळवला होता. 500 रुपयांनी किंमती वाढल्यानंतर तितकीच घसरण झाली होती. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच चांदीने 1 हजार रुपयांची दरवाढ नोंदवली.
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी महागली. 24 कॅरेट सोने 71,816 रुपये, 23 कॅरेट 71,528 रुपये, 22 कॅरेट सोने 65,784 रुपये झाले. 18 कॅरेट 53,862 रुपये, 14 कॅरेट सोने 42,012 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 81,292 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.