नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणामुळे डॉलर मजबूत स्थिती आला आहे. तर आता बेरोजगारीचे आकडे समोर येणार आहे. अमेरिकन सरकारसमोरील दिवाळखोरीचे संकट तुर्तास टळले आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम सोने-चांदीवर दिसून येत आहे. दोन्ही धातू सध्या दबावाखाली आहे. देशात अनेक दिवसानंतर मौल्यवान धातू निच्चांकाकडे झुकले आहे. काही तज्ज्ञ दिवाळीपर्यंत यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरणीचा अंदाज व्यक्त करत आहेत. ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच घसरणीपासून सुरु झाली आहे. या पाच दिवसांत सोने आणि चांदीत अनुक्रमे हजार आणि तीन हजार रुपयांच्या घरात घसरण झाली. पितृपक्षामुळे पण सराफा बाजारात खरेदी मंदावली आहे. सोने-चांदीचा (Gold Silver Rate Today 6 October 2023) नवीन दर असा आहे.
सोने झाले स्वस्त
गुडरिटर्न्सनुसार, 1 ऑक्टोबर रोजी मोठा बदल झाला नाही. 2 ऑक्टोबर रोजी सोने 150 रुपयांनी स्वस्त झाले. 3 ऑक्टोबर रोजी 650 रुपयांची तफावत आली. 4 ऑक्टोबर रोजी भाव जैसे थे होते. तर 5 ऑक्टोबर रोजी त्यात 200 रुपयांची स्वस्ताई आली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आणि अखेरच्या सत्रात घसरण दिसून आली होती. 22 कॅरेट सोने 52,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,310 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
चांदीत 2800 रुपयांची घसरण
चांदीला सप्टेंबर महिन्यात काहीच कमाल करता आली नव्हती. गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाच 5000 रुपयांनी स्वस्त झाली होती. मध्यंतरी किंमती थोड्या वाढल्या. शेवटच्या सत्रात पुन्हा घसरण दिसून आली.
1 ऑक्टोबर रोजी भावात बदल झाला नाही. 2 ऑक्टोबर रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 3 ऑक्टोबर रोजी चांदी 2000 रुपयांनी घसरली. तर 4 ऑक्टोबर रोजी भाव 300 रुपयांनी घसरले. 5 ऑक्टोबर रोजी भाव 400 रुपयांनी वाढले. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 71,100 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट असा आहे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 56,555 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 56,329 रुपये, 22 कॅरेट सोने 51804 रुपये, 18 कॅरेट 42,416 रुपये, 14 कॅरेट सोने 33,085 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 67,204 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.