एप्रिल महिन्यातच सोने आणि चांदीने या वर्षातील सर्व रेकॉर्ड गुंडाळले. मौल्यवान धातूंच्या हनुमान उडीने ग्राहकांची तारंबळ उडाली. सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमतीत दरवाढीची त्सुनामी आल्याने ग्राहकांना सराफा दुकानातील एसीतही घामाच्या धारा लागल्या. किडूकमिडूक करण्याचा मोह पण गृहलक्ष्मीला आवरता घ्यावा लागला. बेशकिंमती धातूंनी अवघ्या सहा दिवसांत ग्राहकांना दिवसाच तारे मोजावे लागले. गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, एप्रिलच्या पहिल्या सहा दिवसांत सोने 3600 रुपयांनी तर चांदी जवळपास 6,000 रुपयांनी वधारली. या जोरदार मुसंडीमुळे ग्राहकांनी सराफा बाजारातून काढता पाय घेतला. या महिन्यात सोन्यात दोनदा तर चांदीत एकदाच घसरण दिसून आली. यावरुन पुढील अंदाज ग्राहकांना घेता येऊ शकतो. अशा आहेत या मौल्यवान धातूच्या किंमती (Gold Silver Price Today 7 April 2024)
सोने 3600 रुपयांनी महाग
एप्रिलच्या सुरुवातीला सहा दिवसांत सोन्याने मुसंडी मारली. 1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांनी वधारले, 2 एप्रिल रोजी 250 रुपयांची भाव स्वस्त झाले. 3 एप्रिल रोजी 750 रुपयांनी किंमती वधारल्या. 4 एप्रिल रोजी 600 रुपयांची दरवाढ दिसली. तर 5 एप्रिल रोजी 450 रुपयांची स्वस्ताई आली. 6 एप्रिल रोजी 1310 रुपयांची आघाडी उघडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी एकदम सूसाट
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 69,882 रुपये, 23 कॅरेट 69,602 रुपये, 22 कॅरेट सोने 64,012 रुपये झाले.18 कॅरेट 52,412 रुपये, 14 कॅरेट सोने 40,881 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 79,096 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.