या आठवड्याच्या सुरूवातीच्या सत्रातच सोने आणि चांदीत मोठी पडझड झाली. सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्या. सोमवारी सोने किंचित उतरले होते. तर मंगळवारी भाव घसरला. पहिल्या दिवशी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली तर 6 ऑगस्ट रोजी चांदी 3 हजारांहून अधिकने स्वस्त झाली. ग्राहकांना दोन्ही धातूंनी या आठवड्यात मोठा दिलासा दिला. काय आहेत आता मौल्यवान धातूच्या किंमती? (Gold Silver Price Today 7 August 2024 )
सोन्यात मोठी पडझड
या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सोन्यात किंचित घसरण झाली. दुपारच्या सत्रात भावात कोणताच बदल दिसला नाही. तर 6 ऑगस्ट रोजी सोन्यात 870 रुपयांची घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा सोन्यात घसरणीचे संकेत मिळता आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी दणकावून आपटली
गेल्या आठवड्यात चांदीने 3200 रुपयांची उसळी घेतली होती. तर या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी तितकीच घसरण झाली. सोमवारी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. तर 6 ऑगस्ट रोजी चांदी 3200 रुपयांनी घसरली. आज सकाळच्या सत्रात पण घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 82,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69,182, 23 कॅरेट 68,905, 22 कॅरेट सोने 63,371 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,887 रुपये, 14 कॅरेट सोने 40,472 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 79,158 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.