लोकसभा निकालानंतर आता दिल्लीत सत्ता स्थापनच्या हालचालींना जोर आला आहे. शपथविधीची लगबग तोंडावर येऊन ठेपली आहे. एनडीएतील घटक पक्षांना यावेळी महत्व आले आहे. या सर्व घडामोडींचा बाजारावर परिणाम दिसून येत आहे. व्यापार क्षेत्रात तेजीचे सत्र दिसून येत आहे. निकालापूर्वी सोने-चांदी घसरले होते. आता मौल्यवान धातूत मोठी उसळी दिसून येत आहे. सोने-चांदीची अशी आहे किंमत (Gold Silver Price Today 7 June 2024 )
सोन्याची जोरदार मुसंडी
या आठवड्यात 3 जून रोजी 440 रुपयांची घसरण झाली होती. 4 जून रोजी सोन्याने 700 रुपयांची भरारी घेतली होती. 5 जूनला सोने 220 रुपयांनी कमी झाले. तर 6 जून रोजी 700 रुपयांनी सोन्याने मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची 1800 रुपयांची उसळी
या आठवड्यात 3 जून रोजी चांदी 700 रुपयांनी उतरली. 4 जूनला चांदी 1200 रुपयांनी महागली. 5 जूनला 2300 रुपयांनी चांदी आपटली. तर 6 जून रोजी 1800 रुपयांनी भाव वधारले. चांदी अजून भरारी घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,757 रुपये, 23 कॅरेट 72,466 रुपये, 22 कॅरेट सोने 66,645 रुपये झाले. 18 कॅरेट 54,568 रुपये, 14 कॅरेट सोने 42,563 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,407 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता