लग्नसराईत सोने आणि चांदीत स्वस्ताई आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत नरमाई आली होती. त्यानंतर मध्यंतरी किंमती वाढल्या. तर अखेरच्या सत्रात दोन्ही धातुत पुन्हा नरमाईचे सत्र दिसले. अखरेच्या टप्प्यात भाव उतरल्याने सराफा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसेल. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचा वायदा 0.42 टक्क्यांनी वाढला. हा भाव 2,659.60 डॉलर प्रति औसवर पोहचला. अमेरिकेत वृद्धीदर वाढल्याने फेडरल रिझर्व्ह बँक आता व्याज दरात कपात करण्याची शक्यता कमी मानण्यात येत आहे. परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आता सराफा बाजारात अशा आहेत दोन्ही धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 8 December 2024 )
सोन्याने दिला दिलासा
या आठवड्यात सोन्याच्या दरात चढउतार झाला. आठवड्याच्या सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी सोने 650 रुपयांनी स्वस्त झाले. मंगळवारी सोने 430 रुपयांनी महागले. गुरूवारी 110 रुपयांनी किंमती वधारल्या. अखरेच्या सत्रात 6 डिसेंबर रोजी सोन्यात 250 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा भाव काय?
चांदीत स्वस्ताई आणि सुस्तावलेपणा दिसत आहे. या सोमवारी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. त्यानंतर चांदी सुस्तावली. तर 5 डिसेंबर रोजी चांदी 1 हजारांनी वधारली. त्यानंतर किंमतीत मोठा बदल झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,187, 23 कॅरेट 75,882, 22 कॅरेट सोने 69,787 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,140 रुपये, 14 कॅरेट सोने 44,569 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,820 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.