Gold Silver Rate Today 8 May 2024 : सोन्यासह चांदीची भरारी; अक्षय तृतीया महागाईने होणार साजरी; सराफा बाजारात काय किंमती

| Updated on: May 08, 2024 | 8:37 AM

Gold Silver Rate Today 8 May 2024 : अक्षय तृतीया दोन दिवसांवर आली असताना सोने आणि चांदीचा तोरा वाढला आहे. मौल्यवान धातूंनी बाजारात दिमाख दाखवला आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या सणावर खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरते की काय असे ग्राहकांना वाटू लागले आहे.

Gold Silver Rate Today 8 May 2024 : सोन्यासह चांदीची भरारी; अक्षय तृतीया महागाईने होणार साजरी; सराफा बाजारात काय किंमती
सोन्यासह चांदीचा तोरा
Follow us on

अक्षय तृतीया हा स्वंयसिद्ध मुहूर्त मानण्यात येतो. या दिवशी केलेली खरेदी ही अक्षय असते. म्हणजे ते धन कायम राहाते अशी मान्यता आहे. पण त्याअगोदरच सोन्याने दोन दिवसांपासून महागाईची कास धरली आहे. थंडावलेल्या चांदीने पण दरवाढीचा तोरा मिरवला आहे. मौल्यवान धातूच्या किंमती वधारल्याने खरेदीच्या उत्साहावर विरजण पडण्याची भीती आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने तुफान बॅटिंग केली. गेल्या आठ दिवसांत मे महिन्यात दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली नसली तरी या आठवड्याच्या सुरुवातीला किंमती वधारल्या आहेत. काय आहेत सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 8 May 2024 )

सोने सूसाट

गेल्या आठवड्यात सोने जवळपास 2 हजारांनी स्वस्त झाले होते. तर त्यात 400 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली होती. या आठवड्यात 6 मे रोजी सोने 200 रुपयांनी वधारले. तर 7 मे रोजी 330 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी चमकली

17 एप्रिलपासून चांदीला गगनभरारी घेता आलेली नाही. गेल्या आठवड्यात चांदीत नरमाईचे सत्र होते. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने दोन हजारांची भरारी घेतली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच चांदीने 1 हजार रुपयांची दरवाढ नोंदवली. तर 7 मे रोजी एक हजारांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने स्वस्त झाले तर चांदी महागली. 24 कॅरेट सोने 71,668 रुपये, 23 कॅरेट 71,381रुपये, 22 कॅरेट सोने 65,648 रुपये झाले. 18 कॅरेट 53,751 रुपये, 14 कॅरेट सोने 41,926 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 81,661 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.