नवी दिल्ली : जुलै महिन्यात सोने आणि चांदीने (Gold Silver Price Update) मोठी आघाडी घेतली आहे. मे आणि जून महिन्यात दोन्ही धातूंनी दरवाढीला ब्रेक लावला होता. कोणताही नवीन रेकॉर्ड या काळात झाला नाही. सोने 58,000 रुपयांपर्यंत खाली घसरले. त्यामुळे खरेदीदारांची चांदी झाली. चांदीच्या किंमती पण 69000 रुपये किलोपेक्षा उतरल्या. पण जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीने दरवाढीची वर्दी दिली होती. त्यानंतर तेजीचे सत्र सुरुच होते. गुडरिटर्न्सनुसार, सोने-चांदीने कमाल उसळी घेतली. त्यामुळे सराफा बाजारात तेजीचे सत्र आले. सोन्याने चाल बदलल्याने गुंतवणूकदार आता सावध झाले आहेत. सोने-चांदीचा भाव वधारतो की घसरतो हे येत्या काही दिवसांत दिसून येईल.
सोन्याची जोरदार मुसंडी
या महिन्यात, जुलैच्या पहिल्या दिवशी सोन्याने दरवाढीची वर्दी दिली. 1 जुलै रोजी सोन्याने 220 रुपयांची उसळी घेतली होती. 4 जुलै रोजी भाव 100 रुपयांनी वधारले होते. 6 जुलै रोजी सोन्यात 100 रुपयांची वाढ झाली. तर 8 जुलै रोजी सोन्याने जोरदार मुसंडी मारली. किंमती 400 रुपयांनी वधारल्या. 3 जुलै आणि 7 जुलै रोजी रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, 8 जुलै रोजी दरवाढ झाल्यानंतर 22 कॅरेट सोने 54,700 रुपये तर 24 कॅरेट सोने 59,660 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.
अमेरिकन घडामोडींचा परिणाम
अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदरात 25 बेसिस पॉईंटची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने-चांदी दबावाखाली येऊ शकते. डॉलर (Dollar) अजून मजबूत करण्यासाठी फेडरल रिझर्व्हची कवायत सुरु झाली आहे. त्याचा परिणाम सोने-चांदीवर दिसून येऊ शकतो. किंमती घसरु शकतात.
शनिवार-रविवार भाव नाही
इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशन दररोजचे भाव जाहीर करते. देशभरात शनिवार-रविवार आणि केंद्राने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी सोने-चांदीचे दर जाहीर करण्यात येत नाही. या दिवशी सराफा बाजारात शुक्रवारच्या आधारे किंमती अपडेट होतात.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
7 जुलै, शुक्रवारी सोन्यात किंचित वाढ दिसून आली. 24 कॅरेट सोने 58,586 रुपये, 23 कॅरेट 58,351 रुपये, 22 कॅरेट सोने 53,665 रुपये, 18 कॅरेट 43940 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34273 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.