नवी दिल्ली | 5 March 2024 : सोने लवकरच ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवू शकते. येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव 70 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव लवकरच मोठी चढाई करण्याचा अंदाज वर्तविण्या येत आहे. अर्थात यामागे अमेरिकेतील घडामोडी आहेत. अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह सिस्टिम व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. 1 मे रोजी फेड व्याजदरात कपात करु शकते. याविषयीची माहिती गुरुवारी फेडचे चेअरमन जेरोम पॉवेल देतील. त्यामुळे सोन्यात मोठ्या घडामोडी घडतील.
या कारणांकडे कसे करणार दुर्लक्ष
सोने 70 हजारी मनसबदार
हा कोणताही नारा नही. सोन्याचा भाव लवकरच 70 हजार रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याच्या भावात 5400 रुपयांची वाढ दिसत आहे. तर येत्या तीन महिन्यात तज्ज्ञांच्या मते सोने 8 टक्क्यांची भरारी घेऊ शकते. या वर्षात सोन्याच्या किंमतीत 1.6 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली. 24 कॅरेट सोने 63,480 रुपये, 23 कॅरेट 63,226 रुपये, 22 कॅरेट सोने 58,148 रुपये झाले.18 कॅरेट 47,610 रुपये, 14 कॅरेट सोने 37,136 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,777 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.