नवी दिल्ली | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोने खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. दिल्लीत सराफा बाजारा सोन्याच्या दरात विशेष बदल पाहायला मिळाले नाही. सोन्याचा एक तोळ्याचा दर हा 56 हजारावर क्लोज झाला. तर 1 चांदीचा भाव हा 65 हजार रुपयांवर क्लोज झाला. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात झालेल्या उसळीमुळे बाजारात किंचित वाढ पाहायला मिळाली. एचडीएफसी सेक्यिरिटीजने याबाबतची माहिती दिली आहे.
सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली. या वाढीमुळे सोन्याचे 10 ग्रॅमचा दर हा 56 हजार 307 रुपये इतका झाला आहे. मागील सत्रात सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर हा 56 हजार 257 रुपयांवर क्लोज झाला. तर चांदीच्या दरात 140 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदीच्या एका किलोचा दर हा 65 हजार 770 रुपये इतका झाला.
दरम्यान आपल्या आपल्या शहरातील सोन्याचे दर हे घरबसल्या ही जाणून घेता येतात. यासाठी फक्त तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. मिस्ड कॉल दिल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या शहरातील सोन्याचे दर समजतील.
जर तुम्हीही येत्या काही दिवसांमध्ये सोने खरेदी करणार असाल, तर खालील गोष्टींची काळजी नक्की घ्या. हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. तसेच सोन्याची शुद्धता जाणून घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत app वापरु शकता. ‘BIS Care app’ असं या app चं नाव आहे. या app द्वारे तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्याची शुद्धता तपासू शकता. तसेच या app द्वारे तक्रारही करु शकता.