नवी दिल्ली | 18 जुलै 2023 : सोने-चांदीने (Gold Silver Price Today) जुलै महिन्याचा पंधरवाडा गाजवला. पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले. पण या आठवड्यात अजून ही सोने-चांदीला गेल्या आठवड्यासारखी भरारी घेता आलेली नाही. सोने-चांदीच्या भावात नरमाई आहे. जागतिक घडामोडींमुळे दोन्ही धातूंवर दबाव आहे. किंमतीत मोठी दरवाढ झालेली नाही. डॉलर निच्चांकावर आल्याने सोने-चांदीच्या किंमती वधारल्या होत्या. आता पुढील आठवड्यात अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढविण्याची शक्यता आहे. गेल्या शनिवारपासून सोने-चांदीत मोठी दरवाढ झालेली नाही. सोमवारी दोन्ही धातूंमध्ये घसरण दिसून आली. काय आहे अपडेट
सोने-चांदी वधारले
जुलै महिन्यात सोने-चांदीने जोरदार उसळी घेतली. या पंधरवाड्यात दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली. या पंधरा दिवसात सोने जवळपास 1400 रुपयांनी वधारले. तर चांदीने 5 हजार रुपयांची झेप घेतली.
काय आहे भाव
शनिवारपासून सोने-चांदीत मोठी वाढ झाली नाही. 17 जुलै रोजी किंमती 20 रुपयांनी घसरल्या. 22 कॅरेट सोने 55,130 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. जुलै महिन्यात सोने जवळपास 1400 रुपयांनी वधारले. तर चांदीने 5 हजार रुपयांची झेप घेतली.
चांदी वधारली
गुडरिटर्न्सनुसार, चांदीने 5000 रुपयांचा टप्पा ओलांडला. 5 जुलै रोजी 500, 6 जुलै रोजी 800, 8 जुलै रोजी 1000, मध्यंतरी 300, 13 जुलै रोजी 2000, 14 जुलै रोजी 1500 रुपये प्रति किलो किंमती वधारल्या.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 59,270 रुपये, 23 कॅरेट 59,033 रुपये, 22 कॅरेट सोने 54,291रुपये, 18 कॅरेट 44,453 रुपये, 14 कॅरेट सोने 34,673 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
हॉलमार्कनुसार कॅरेट
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.
गेल्या 6 वर्षांत इतकी घसरण
सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे गेल्या 6 वर्षांत सोन्याला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मागणीत प्रचंड घसरण झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अहवालानुसार, एक वर्षांत सोन्याच्या मागणीत 17 टक्के घट झाली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 135 टन सोने आयात झाले. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत ही मागणी घसरुन 112 टनवर आली. मूल्यआधारीत विचार करता, 9 टक्के घट झाली. मार्च तिमाहीत हा आकडा 56,220 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षांतील याच तिमाहीत हा आकडा 61,540 कोटी रुपये होता.