Gold Silver Rate Today : दरवाढीच्या फ्युएलवर सोन्याची उंच उडी, चांदीने पण घेतली भरारी

| Updated on: Jul 21, 2023 | 9:21 AM

Gold Silver Rate Today : अमेरिकेतील घडामोडींमुळे सोने-चांदी हरकून गेले आहे. एक आनंदाची वार्ता येऊन धडकल्याने दोन्ही धातूंची आगेकूच सुरु आहे. सराफा बाजारात सध्या तेजीचे सत्र सुरु आहे.

Gold Silver Rate Today : दरवाढीच्या फ्युएलवर सोन्याची उंच उडी, चांदीने पण घेतली भरारी
Follow us on

नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : सोने आणि चांदीला बळ मिळत आहे. पुढील आठवड्यात सोने-चांदी उंच भरारी घेऊ शकतात. अमेरिकेतील घाडमोड त्यासाठी कारणीभूत ठरु शकते. अमेरिकेतील घडामोडींमुळे सोने-चांदी हरकून गेले आहे. एक आनंदाची वार्ता येऊन धडकल्याने दोन्ही धातूंची आगेकूच सुरु आहे. सराफा बाजारात सध्या तेजीचे सत्र सुरु आहे. जुलै महिना गुंतवणूकदारांना पावला आहे. जून आणि मे महिन्यात ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली. त्यांना चांगला परतावा मिळू शकतो. खरेदीदारांना सध्या जास्त खिसा खाली करावा लागत आहे. कारण सोने आणि चांदीत मोठी दरवाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आता 20 जुलै पर्यंत सोने-चांदीत (Gold Silver Price Today) मोठी उसळी आली आहे. दोन्ही धातूंच्या किंमती वधारल्या आहेत. या महिन्यात सोन्याने 2,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने 6500 रुपयांची झेप घेतली आहे. लवकरच दोन्ही धातू नवीन दर गाठू शकतील. काय आहे सोने-चांदीतील अपडेट..

जागतिक घडामोड पथ्यावर

महागाई आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले होते. एक वर्षांपासून ही वृद्धी सुरु होती. महागाईचा प्रभाव कमी झाला. गेल्यावेळी फेडने व्याज वाढवले नाही. यावेळी फेड व्याजदर वाढवणार अशी भीती होती. पण सध्या बाजारातील चर्चेनुसार फेड व्याजदरात वाढ करणार नाही. त्यामुळे जागतिक बाजारात सोने-चांदीला भरारी घ्यायला संधी मिळणार आहे. दुसरीकडे चीनच्या खेळीने तांब्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

हे सुद्धा वाचा

सोने-चांदीची आगेकूच

सोने आणि चांदीची आगेकूच सुरु आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आता पर्यंत सोने-चांदीत मोठी उलाढाल झाली. दोन्ही धातूंनी मुसंडी मारली. या महिन्यात सोन्याने 2,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने 6500 रुपयांची झेप घेतली आहे. अजून दोन्ही धातूंना किंमतीत नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही.

काय आहे भाव

आठवड्याच्या पहिल्या दिवशी 17 जुलै रोजी किंमती 20 रुपयांनी घसरल्या होत्या. 22 कॅरेट सोने 55,130 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते. 18 जुलै रोजी मोठी उलाढाल झाली नाही. तर 19 जुलै रोजी भावाने मोठी आघाडी घेतली. सोन्याने 670 रुपयांची उसळी घेतली. या महिन्यातील ही सर्वात मोठी झेप आहे. 20 जुलै रोजी सोन्यात 100 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 55,850 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,900 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वधारले.

चांदी वधारली

गुडरिटर्न्सनुसार, 20 जुलै रोजी चांदीचा भाव स्थिर होता. 19 जुलै रोजी किंमतीत 400 रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 78,400 रुपयांवर पोहचला. तर यापूर्वी 5 जुलै रोजी 500, 6 जुलै रोजी 800, 8 जुलै रोजी 1000, मध्यंतरी 300, 13 जुलै रोजी 2000, 14 जुलै रोजी 1500 रुपये प्रति किलो किंमती वधारल्या. तर 18 जुलै रोजी किंमत 300 रुपयांनी वाढली.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,863 रुपये, 23 कॅरेट 59,623 रुपये, 22 कॅरेट सोने 54,835 रुपये, 18 कॅरेट 44,897 रुपये, 14 कॅरेट सोने 35,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

गेल्या 6 वर्षांत इतकी घसरण

सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे गेल्या 6 वर्षांत सोन्याला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मागणीत प्रचंड घसरण झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अहवालानुसार, एक वर्षांत सोन्याच्या मागणीत 17 टक्के घट झाली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 135 टन सोने आयात झाले. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत ही मागणी घसरुन 112 टनवर आली. मूल्यआधारीत विचार करता, 9 टक्के घट झाली. मार्च तिमाहीत हा आकडा 56,220 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षांतील याच तिमाहीत हा आकडा 61,540 कोटी रुपये होता.