Gold Silver Rate Today : सोन्याने आणले हसू, चांदीने डोळे वटारले, खरेदीदारांनी लावल्या रांगा

| Updated on: Jun 28, 2023 | 9:11 AM

Gold Silver Rate Today : सोन्याचे भाव घसरणीवरच आहे. तर चांदीने बाजी पलटवली. चांदीने बऱ्याच दिवसानंतर उसळी घेतली. सोने स्वस्त झाल्याने ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केली आहे. जाणून घ्या आजचे ताजे भाव

Gold Silver Rate Today : सोन्याने आणले हसू, चांदीने डोळे वटारले, खरेदीदारांनी लावल्या रांगा
आजचा भाव काय
Follow us on

नवी दिल्ली : सराफा बाजारात सोने पुन्हा घसरले. कालच्या भावावर नजर टाकली असता या मौल्यवान धातूत पडझड झाल्याचे दिसून आले. चांदीच्या किंमतींनी मात्र कमबॅक केले आहे. बऱ्याच दिवसांनी चांदीने उसळी घेतली आहे. जागतिक बाजारात सोने आणि चांदी (Gold Silver Price Today) दबावाखाली आहे. सोने तर तीन महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहचले आहे. त्यातच काही केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढीचा इशारा दिला आहे. डॉलर सध्या मजबूत स्थितीत आहे. या घडामोडींमुळे सोने आणि चांदी दबावात आहे. त्यामुळे किंमतीत चढउतार दिसून येत आहे. पण गेल्या दोन महिन्यांपासून दोन्ही मौल्यवान धातूत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केली आहे.

दहा दिवसांत पडझड

  • 19 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,210 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
  • 20 जून रोजी 24 कॅरेट सोन्यात 60 रुपये घसरण झाली. भाव 60,150 रुपयांवर पोहचला
  • 21, 22 जून रोजी किंमती अनुक्रमे 330, 220 रुपयांनी उतरल्या. भाव 59600 रुपयांवर आला
  • 23 जून रोजी 430 रुपयांनी किंमती उतरल्या. भाव 59,170 रुपये झाला
  • 24 आणि 26 जून रोजी किंमती अनुक्रमे 160 आणि 100 रुपयांनी महागल्या
  • 27 जून रोजी सोन्याची किंमत 59,430 रुपये प्रति 10 ग्रॅम होत्या
  • गुडरिटर्न्सने आज सकाळचे दर अपडेट केले नाहीत

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
27 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,442 रुपये, 23 कॅरेट 58,208 रुपये, 22 कॅरेट सोने 53,533 रुपये, 18 कॅरेट 43,832 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34189 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत दरवाढ झाली. चांदीच्या किंमती जवळपास दोनशे रुपयांनी वधारल्या. चांदीने उसळी घेतली असली तरी याआधीच्या किंमतींपेक्षा हे दर कमी आहेत. काल एक किलो चांदीचा भाव 69,523 रुपये होता. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.

हे सुद्धा वाचा

किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.