नवी दिल्ली | 10 March 2024 : मार्च महिन्यात सोन्याने मोठी मुसंडी मारली. सोन्याच्या किंमतीत वधारल्या आहेत. MCX Exchange वर गेल्या शुक्रवारी सोन्याचा वायदा 66,023 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या उच्चस्तरावर पोहचल्या आहेत. सोने दहा दिवसांत 3,430 रुपयांनी वधारले. या बंपर तेजीमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे. या दरवाढीमागे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह ही बँक आहे. बँकेने व्याज दरात कपातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जागतिक आणि देशातील बाजारात सोन्याने उसळी घेतली आहे.
जून महिन्यात दर कपातीची शक्यता
अमेरिकन केंद्रीय बँकेचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी येत्या महिन्यात युएस फेडद्वारा व्याजदर कपतीचे संकेत दिले आहे. त्यामुळे बाजाराचा विश्वास वाढला आहे. सोने बुधवारी जागतिक बाजारात 2,152 डॉलर, या नवीन उच्चांकावर पोहचले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी जागतिक बाजारात सोन्याची किंमत 0.25% कमी होऊन 2032.8 डॉलर प्रति औसवर बंद झाल्या होत्या.
डॉलर इंडेक्समध्ये घसरण
सोन्याच्या किंमतीत उसळी आल्याने डॉलर इंडेक्समध्ये मोठी घसरण दिसून आली. डॉलर निर्देशांक पुन्हा 104 या निच्चांकावर पोहचला आहे. यावेळी निर्देशांक 6 प्रमुख चलनाच्या बास्केटच्या तुलनेत 103.80 डॉलरवर आहे. हा स्थिर आहे. गेल्या पाच व्यापारी सत्रात मात्र डॉलर निर्देशांकात 0.17 टक्के घसरण दिसून आली.
3,430 रुपयांनी सोने महाग
मार्च महिन्यात सोन्याने तुफान फटकेबाजी केली. या दहा दिवसांत आणि या आठवड्यात सोने महागले. तर या महिन्यात 3,430 रुपयांची दरवाढ झाली. 1 मार्चपासून ते 10 मार्चपर्यंत 3,430 रुपयांनी सोने महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
किती वाढतील किंमती
आता तज्ज्ञांच्या मते, सोने आणि चांदीच्या किंमतीतील तेजीचे सत्र कायम असेल. दोन्ही धातूंची मोठी फटकेबाजी सुरु आहे. त्यामुळे या किंमती अजून किती वाढतील असा खरा प्रश्न आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 64,955 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. तर एक किलो चांदीचा भाव 72,265 रुपये आहे. तज्ज्ञांच्या मते, सोने 70 हजारांचा टप्पा गाठेल तर चांदी प्रति किलो 90 हजार रुपयांवर पोहचेल.