Gold Silver Rates Today : शुद्ध सोन्यासाठी करावा लागेल खिसा खाली, आजचा भाव किती?

| Updated on: Jan 28, 2023 | 4:33 PM

Gold Silver Rates Today : भारतीय सराफा बाजारात सोने निखरले तर चांदीची चमक फिक्की झाली. आजचा भाव काय

Gold Silver Rates Today : शुद्ध सोन्यासाठी करावा लागेल खिसा खाली, आजचा भाव किती?
आजचा दर काय
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या वर्षी दिवाळीनंतर सोन्याने जोरदार आगेकूच केली आहे. 50,000 रुपयांच्या खाली घसरण झालेल्या सोन्याने पुन्हा मुसंडी मारली. आज सोन्याचा भाव (Gold Price) 60,000 रुपयांच्या जवळपास आहे. 26 जानेवारीला सराफा बाजारात (Sarafa Market) भाव 58,000 रुपयांवर पोहचल्याचे गुडरिटर्न्स या संकेतस्थळावरील आकडेवारीवरुन दिसून येते. गेल्या तीन महिन्यात सोने सूसाट आहे. तर चांदीच्या किंमतीही (Silver Price) वधारल्या आहेत. पण सध्या चांदीचा वेग मंदावला आहे. आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे गुड रिटर्न्सच्या संकेतस्थळावरील आकडेवारीवरुन समोर येते. येत्या काही दिवसात सोने आणि चांदी गुंतवणूकदारांना मालामाल करतील, असा तज्ज्ञांचा दावा आहे.

आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,800 रुपये आहे. काल हा भाव 52,650 रुपये होता. म्हणजे भावात 150 रुपयांची तफावत आहे. गुड रिटर्न्स संकेतस्थळावर 24 कॅरेट सोन्याची आकेडवारी देण्यात आली आहे. त्यानुसार, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,590 रुपये आहे. काल हा भाव 57,420 रुपये होता. भावात 170 रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीच्या किंमतीत मात्र घसरण सुरु आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आणि नोव्हेंबर 2022 च्या सुरुवातीला चांदीचा भाव 57-59 हजारांच्या दरम्यान होते. आज चांदीचा भाव 72,200 रुपये किलोवर पोहचला आहे. तरी कालपेक्षा आजच्या भावात किलोमागे 400 रुपयांची घसरण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय मानके संस्थेद्वारे (Indian Standard Organization-ISO) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते.

अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. या दोन्ही प्रकारच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते.

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. त्यामुळे अनेक सराफा दुकानदार 22 कॅरेट सोन्याची विक्री करतात.

ibja केंद्र सरकारने घोषीत केलेल्या सुट्यांच्या दिवशी, शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किरकोळ भाव जाणून घेण्यासाठी ग्राहकांना 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. याशिवाय एसएमएस करुनही किंमती माहिती करुन घेता येईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कर आकारण्यात येईल.