नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात (Sarafa Market) शुक्रवारी, 16 डिसेंबर रोजी सोने आणि चांदीच्या भावात (Gold-Silver Rate) घसरण दिसून आली. आज सकाळी नवीन दर जाहीर झाले. त्यानुसार, 999 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर आज 53 हजारांचा 885 रुपये होता. तर 999 शुद्धतेची एक किलो चांदीची चमक फिक्की पडली. 67 हजारांच्या वर गेलेला भाव, 66307 रुपये झाला. सध्या सोन्यात कायम चढ-उतार होत आहे. चांदीच्या किंमतीत वाढ होत असताना आज चांदीत मोठी घसरण दिसून आली.
इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewelers Association) याविषयीच्या भावांची घोषणा करते. अधिकृत संकेतस्थळ ibjarates.com नुसार, आज सकाळी 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याच्या भावात घसरण झाली. 54,244 रुपयांवरुन हा भाव 53,670 रुपयांवर आला.
तर 916 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,887 रुपयांहून 49,358 रुपये झाला. 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 40,846 रुपयांवरुन 40,413 रुपयांवर पोहचला. तर 585 शुद्धतेचे सोने 31860 रुपयांऐवजी आज 31,522 रुपये होते. या सर्व भावात दोन दिवसात मोठी घसरण दिसून आली.
तज्ज्ञांच्या मतानुसार, येत्या काही दिवसात चांदीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 61-62 हजारांपर्यंत घसरलेली चांदी आज 66,000 रुपयांच्या घरात आहे. दोन दिवसांपूर्वी 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 67,976 रुपये होता.तो घसरुन आज हा दर 66,307 रुपये झाला.
ibja द्वारे दररोज भाव जाहीर होतात. केंद्राने घोषीत केलेल्या सुट्यांऐवजी शनिवार आणि रविवारी नवीन दर जाहीर करण्यात येत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव जाणून घेण्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. काही मिनिटातच SMS द्वारे नवीन दर माहिती होतात.