नवी दिल्ली : सोने खरेदीरांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी (Investors) खूशखबर आहे. भारतीय सराफा बाजारात आज 10 जानेवारी 2023 रोजी सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) घसरण झाली. सोन्याच्या किंमती 56 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. तर चांदीचा भाव 67 हजार रुपये प्रति किलोपेक्षा अधिक आहे. आज 999 शुद्ध 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,148 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदी 67,964 रुपये किलो आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) नुसार, सोमवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 56,259 रुपये होता. हा भाव आज सकाळी 56,148 रुपयांवर आला. शुद्धतेच्या प्रमाणाआधारे सोन्या-चांदीचे दर कमी झाले.
सराफा बाजारातील अधिकृत संकेतस्थळ ibjarates.com नुसार, आज सकाळी 10 ग्रॅम 995 शुद्ध सोन्याच्या भावात घसरण होऊन ते 55,923 रुपयावर पोहचले. तर 916 शुद्ध सोन्याचा दर आज 51,432 रुपये होता. इतर शुद्धतेच्या सोन्यातही कमालीची घसरण झाली.
750 शुद्ध सोन्याचा दर घसरुन तो 42,111 रुपयांवर पोहचला. 585 शुद्ध सोने आज स्वस्त झाले. सोन्याचा दर 32,847 रुपये झाला. तर 999 शुद्ध एक किलो चांदीची किंमत 67,964 रुपये झाली. चांदीच्या किंमती लवकरच वाढणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.
वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.