नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात (Sarafa Bazar) मंगळवारी सकाळी सोने आणि चांदीचे दर (Gold-Silver Rates) कमी झाले. नवीन दरांनुसार, 999 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याची किंमती 52 हजारांवर आली आहे. तर 999 शुद्ध चांदी प्रति किलो 61 हजारांच्या पुढे आहे. सोन्याचे दर घसरल्याने खरेदीदार, गुंतवणूकदारांना (Investors) आयती संधी मिळाली आहे. येत्या काही दिवसात सोन्याच्या किंमती 56,000 रुपयांचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येते आहे. त्यामुळे आता केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरु शकते.
अधिकृत संकेतस्थळ ibjarates.com नुसार, आज सकाळी 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचे दर घसरुन 52,504 रुपयांवर आलेत. तर 916 शुद्ध सोन्याचा दर आज 48,287 रुपये होता. याशिवाय, 750 शुद्ध सोन्याचे दर घसरुन 39,536 रुपये झाला.
तर 585 शुद्ध सोन्याच दर आज 30,838 रुपयांवर आला. सोन्याच्या किंमतीत आज 100 ते 125 रुपयांची घसरण दिसून आली. 999 शुद्ध चांदी प्रति किलो 61 हजारांच्या पुढे आहे. चांदीचा दर आज 61,590 रुपये प्रति किलो होता.
सोन्या-चांदीच्या किंमती सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा बदल दिसून येतो. सकाळच्या ताज्या घाडमोडींनुसार, 999 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 137 रुपये तर 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 136 रुपयांचा फरक दिसून आला. सोने स्वस्त झाले. तर चांदी एका किलोमागे 520 रुपयांनी स्वस्त झाली.
24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. त्यानुसार किंमतींमध्ये ही फरक पडतो. ग्राहकांना शुद्धतेनुसार रक्कम अदा करावी लागते.
इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.