नवी दिल्ली : आज मराठी नव वर्षाला सुरुवात झाली. चैत्र शुद्ध प्रतिपदेला शुद्ध सोन्याने आणि चांदीने (Gold Silver Price Today) आज महागाईची गुढी उभारली आहे. सोन्याचा तोरा तर आहेच पण चांदी ही चमकली आहे. मंगळवारी सकाळी सोन्याने युटर्न घेतला होता. पण संध्याकाळी गुढीपाडव्याचा (Gudi Padva) मुहूर्त या दोन्ही मौल्यवान धातूंनी साधलाच. सोन्याने या शनिवार-रविवारी यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले. गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता. रविवारी 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले होते. सोने रेकॉर्डवर रेकॉर्ड करत आहे. तर चांदीमधील चमक कायम आहे. 22 मार्च रोजी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे.
22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा वाढ झाली. 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 200 रुपयांची वाढ झाली. आज सकाळी हा भाव 55,150 रुपये आहे. तर रेकॉर्डस्तरावरुन 24 कॅरेट एक तोळा सोने आज स्वस्तात खरेदी करता येईल. आज हा भाव 60,150 रुपये आहे. चांदी किलोमागे 100 रुपयांनी घसरली आहे. चांदीचा भाव 72,100 हजार रुपये किलो आहे. गुडरिटर्न्सने हे ताजा भाव जाहीर केले आहेत. आयबीजेएने अजून भाव अपडेट केलेले नव्हते. आज गुढीपाडव्यानिमित्त शासकीय सुट्टी असल्याने भाव जाहीर होण्याची शक्यता कमी आहे.
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.
सोन्याची दरवाढीची गुढी